आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक म्हणतो ऐश्वर्याला 'सुपरमॉम', सांगितला आराध्याच्या जन्मानंतर घडलेला प्रसंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडस्ट्रीत स्वीट कपल्सपैकी एक नाव अभी आणि अॅशचेदेखील आहे. ज्युनियर बच्चनची ऐश्वर्या रायसोबत पहिली प्रोफेशनल मीटिंग 1999 मध्ये एका फोटोशूटच्या वेळी झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत ऐश्वर्यामध्ये काय बदल झाला याविषयी स्वत: अभिषेक सांगत आहे... 
 
अभिषेक म्हणाला, 'ऐश्वर्यासोबत माझी पहिली व्यावसायिक भेट 1991 मध्ये झाली होती. नंतर 'ढाई अक्षर प्रेम के'(2000) च्या फोटोशूटमध्ये भेटलो. हा आमचा सोबतचा पहिला चित्रपट होता. गेल्या 17 वर्षांपासून मी तिला ओळखतो, आमच्या लग्नालादेखील 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही अॅश पहिल्यासारखीच जमिनीशी जोडलेली आहे. 18 वर्षांतच अॅशने मॉडेलिंग आणि अॅक्टिंग करणे सुरू केले होते. याचा तिने आंनदही लुटला."
 
अभिषेक सांगतो, "90 च्या काळात तिचा करिअर ग्राफ चांगला होता. ती मिसवर्ल्ड ठरली आणि 'मोस्ट ब्यूटीफुल ऑन अर्थ' चा किताब आपल्या नावावर केला. त्यानंतर तिला मणिरत्नम यांच्या नॉन ग्लॅमरस 'इरुवर' (1997) चित्रपटात काम मिळाले. त्याचा अनुभव शेअर करत अॅशने मला सांगितले होते की, पहिल्या दिवशी मी जेव्हा विना मेकअपची सेटवर गेले होते तेव्हा मणी सरांनी तिला साबण देत चेहरा धुवायचे सांगितले होते." 
 
सुपरमॉम आहे अॅश... 
अभिषेक म्हणाला, "ऐश्वर्या जेव्हा आई झाली तेव्हा ती करिअरपासून दूर गेली होती. आज ती आराध्यासाठी सगळे काही करते. अॅश सुपरमॉम आहे. आराध्याच्या जन्मानंतर अॅशचे वजन खूप वाढले होते, त्यावर खूप काही लिहिण्यात आले. त्या वेळी मला खूप वाईट वाटत होते. मात्र ती म्हणायची, जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा बदक परत येतील. या टीकांविषयी तिने कधीच तक्रार केली नाही, नाराजी व्यक्त केली नाही. मुळात तिने कधीही या प्रतिक्रिया मनावर घेत दिवसाचा जास्तीत जास्त वेळ जिममध्ये घालवला नाही. याउलट मी दुखावलो जात आहे, हे पाहून तिनेच मला धीर दिला होता."
 
पुढील स्लाईड्सवर बघा, सुपरमॉम ऐश्वर्याचा कुणालाही घायाळ करेल असा ग्लॅमरस अंदाज... 
बातम्या आणखी आहेत...