आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Shot ‘Dangal’ Muhurat Scene In Ludhiana

आमिरने शूट केला \'दंगल\'चा पहिला सीन, रिअल महावीर फोगटने दिला Clap

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(\'दंगल\'च्या मुहूर्त शॉटदरम्यान महावीर फोगट आणि आमिर खान)
 
गुरुवारी (24 सप्टेंबर) बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या \'दंगल\' सिनेमाचा पहिला सीन लुधियानामध्ये शूट झाला. मुहूर्त शॉटवेळी रेसलर महावीर फोगट उपस्थित होते आणि त्यांनी याला क्लॅप दिला. यादरम्यान आमिरने महावीरच्या मुली गीता आणि बबिता फोगटचीसुध्दा भेट घेतली. 
 
नितेश तिवारी दिग्दर्शित हा सिनेमा महावीर फोगट यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. त्यामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. वाल्ट डिज्नी, किरण राव, आमिर खान आणि सिध्दार्थ रॉय कपूर या सिनेमाचे निर्माते आहेत. 
 
आमिरशिवाय साक्षी तंवर, फातिमा सना शेख आणि सनाया मल्होत्रा आणि राजकुमार रावसुध्दा मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमा येत्या 23 डिसेंबरला रिलीज होणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुहूर्त शॉटदरम्यानचे फोटो...