आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Hrithik Roshan\'s Ex wife Sussanne Khan\'s Beach Holiday In Goa With Her Kids

गोव्यात हॉलिडे एन्जॉय करतेय हृतिकची Ex-वाईफ सुझान, बहिणीसोबत दिसली बिकिनीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहीण फराह आणि मुले हृहान-हृदानसोबत सुझान खान - Divya Marathi
बहीण फराह आणि मुले हृहान-हृदानसोबत सुझान खान
अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान सध्या गोव्यात सुटीचा आनंद लुटतेय. मात्र येथे ती एकटी नसून तिची दोन्ही मुले हृहान आणि हृदान तिच्यासोबत आहेत. सुझानची बहीण फराह खान आणि तिचा नवरा डीजे अकील, भाऊ जाएद खान हेदेखील गोव्यात तिच्यासोबत हॉलिडे मूडमध्ये आहेत.
सुझानने बहीण फराह खानसोबतचे बीचवरील एक फोटो इंस्टाग्राम अकाउंवर शेअर केला आहे. या फोटोत दोघी बहिणी बिकिनीत दिसताहेत. फोटोसोबत सुझानने लिहिले, "गोव्याच्या आठवणी. सुंदर बिकिनी बॉडी असलेली माझी बहीण. जेव्हा तुम्ही बीचवर असता तेव्हा आयुष्य खूप सुंदर असतं."
सुझानने गोव्याच्या बीजवर मैत्रिणींसोबत सनबाथ घेत असतानाचादेखील एक फोटो अपलोड केला आहे. शिवाय आपल्या मुलांसोबतही तिने सेल्फी घेतल्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सुझान खानने शेअर केलेले गोव्याचे फोटोज...