(सलमान खानचा घराबाहेर पडतानाचा व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा.)
बॉलिवूडचा दबंग अर्थातच अभिनेता
सलमान खानसाठी आजचा दिवस मुळीच चांगला नाहीये. तेरा वर्षांपासून सुरु असलेल्या हिट अँड रन प्रकरणाचा आज निकाल आला असून सेशन कोर्टाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सकाळी
आपल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधून सेशन कोर्टाच्या दिशेने सलमान निघाला. गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडण्यापूर्वी सलमानने आईवडिलांची गळाभेट घेतली. यावेळी त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
घरातून बाहेर पडल्यानंतर तासाभरात सलमान सेशन कोर्टात पोहोचला. यावेळी सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंह गाडी चालवत होता. तर सलमान त्याच्या शेजारी बसला होता. दुस-या गाडीतून सलमानची धाकटी बहीण अर्पिता आणि भाऊ सोहेल खान कोर्टात पोहोचले. यावेळी बाबा सिद्दीकीसुद्धा सोहेल खानसोबत दिसले.
कोर्टाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मीडिया आणि लोकांची मोठी गर्दी कोर्टाबाहेर बघायला मिळाली. काही लोकांनी सलमानला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, या अर्थाचे पोस्टर धरुन उभे दिसले.
या पॅकेजमध्ये तुम्ही सलमानची गॅलेक्सी अपार्टमेंटमधून कोर्टात पोहोचतानाची छायाचित्रे बघू शकता..