आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सडपातळ सलमानवर नव्हता कुटुंबीयांना विश्वास, वाचा त्याच्याविषयी घरी काय व्हायचे बोलणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक काळ असा होता, जेव्हा सलमान खान भविष्यात यशस्वी अभिनेता होईल, यावर त्याच्या कुटुंबीयांचा मुळीच विश्वास नव्हता. सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानने सांगितल्याप्रमाणे, त्याकाळात सलमान खूप बारीक होता, त्यामुळे तो अभिनेता होऊ शकेल, यावर त्यांच्या आईवडिलांना विश्वास नव्हता. 'मैंने प्यार किया' या सिनेमात सलमान अतिशय बारीक दिसतोय. मात्र त्यानंतर घडलेला इतिहास सर्वश्रुत आहे. सलमानने बॉलिवूडमध्ये आज स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. काय साम्य आहे खान ब्रदर्समध्ये...

- अलीकडेच चंदीगडमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या सोहेल आणि अरबाज खानने सलमानविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. सोहेल म्हणाला, आज सलमानवर कामाचा अतिशय ताण आहे. मात्र तो स्वतःला कामात एवढे गुंतवून घेईल, असे आम्हाला पूर्वी कधीच वाटले नव्हते.
- सलमानला बघून तो पॉवर पॅक भूमिका साकारु शकेल, असेही आम्हाला कधीच वाटले नव्हते. कारण त्याकाळात सलमान कधीच कामाविषयी एवढा सीरिअल नव्हता.
- जेव्हा सलमानला त्याच्या मनासारखे काम मिळाले, तेव्हा त्याची 'वाँटेड' आणि 'दबंग' ही इमेज बनू शकली.
- जी व्यक्ती थोड काम केल्यानंतर दमून जायची, तिने आज स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
- आज ही परिस्थिती आहे, की जेव्हा सलमानला काही वेगळं करायला मिळत नाही, तेव्हा आपण मेहनत करतोय, असे त्याला वाटत नाही.

अरबाजने सांगितले, काय आहे खान ब्रदर्समध्ये कॉमन...
- अरबाजने खान ब्रदर्समधील कॉमन गोष्ट सांगताना म्हटले, की आम्हा तिघेही भाऊ गरजूंना मदत करण्साठी नेहमी तयार असतो.
- अरबाज म्हणाला, आमच्या तिन्ही भावांचे मन मोठे आहे. मात्र लोकांना हे ठाऊक नाही, म्हणून ते वाट्टेल ते आमच्याविषयी बोलत असतात.
- अरबाज पुढे म्हणाला, ज्या प्रमाणे इंडस्ट्रीत झपाट्याने बदल होतोय, दिग्दर्शक अभिनेता बनतोय, प्रोड्युसर गाणी लिहितोय, तसेच मीसुद्धा खूप काही करतोय. मी १९९६ मध्ये अॅक्टिंगला सुरवात केली.
- २०१० मध्ये दबंग बनवला. त्यात मी कामही केले, प्रोड्युसही केला. या १६ वर्षांत अभिनयासोबत निर्मितीतही मी आलो.

'दबंग २' मधून दिग्दर्शनाकडे वळला अरबाज...
- अरबाजने सांगितले, की 'दबंग २' या सिनेमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. मध्यंतरी जो गॅप होता, त्यात फिल्म मेकिंगमध्ये मी बिझी होतो. कारण हे काम शूटिंग शेड्युलप्रमाणे नसते.
- कॉन्सेप्टवर विचार करावा लागतो, प्लानिंग करुन शेवटपर्यंत विचार करावा लागतो.
- प्री प्रॉडक्शन, पोस्ट प्रॉडक्शनच्या कामात दोन ते तीन वर्षे निघून जातात. ही गॅप अभिनेता म्हणून मी वापरतो.
- एका कलाकाराला नेहमी संघर्ष करावा लागतो. अभिनयाकडे मी छंद म्हणून बघतो.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, खान ब्रदर्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...