आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 आठवडे विवेक राहिला होता मुंबईच्या झोपडपट्टीत, सार्वजनिक शौचालयाचा केला वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- विवेक ओबेरॉय गुरुवारी (15 ऑक्टोबर) इंदूरला आला होता. मेयो कॉलेज अजमेरमधून शालेय शिक्षण आणि एनवायसूमधून अभिनयाचा कोर्स करून विवेक अभिनय क्षेत्रात आला. विवेकसोबत झालेल्या बातचीतमध्ये लक्षात आले, की तो प्रत्येक भूमिकेचा अभ्यास करतो. आठवड्यातून कधी-कधी तो वडिलांसोबत धार्मिक सिनेमेसुध्दा पाहतो. सध्या फादरहूड एन्जॉय करत असलेला विवेक योगा आणि अध्यात्माच्या मार्गावर आहे. इंदूरमध्ये तो तीन शॉपचे उद्धाटन करण्यासाठी आला होता. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांचा त्यांचा होमवर्क खूपच रंजक आहे. विवेकने आमच्यासोबत शेअर केलेले काही किस्से...
चंदू नागरेसाठी तीन आठवडे झोपडीत राहिला-
भूमिकेच्या जवळ जाण्यासाठी रिसर्च आणि मेहनत मी माझ्या 'कंपनी' या पहिल्याच सिनेमापासून सुरु केले होते. कंपनी सिनेमात चंदू नागरेची भूमिका समजावून घेण्यासाठी मी तीन आठवडे झोपडपट्टीत राहिलो. रांगेत उभे राहून सार्वजनिक शौचालयाचा वापर केला. रात्री झोपडीत झोपल्यानंतर मांजराच्या आकाराचे उंदीर अंगावर चढत होते. मी या तीन आठवड्यांपू्र्वी रामगोपाल वर्माला भेटलो होतो. तेव्हा ते मला म्हणाले होते, तू अमेरिकेतून आला आहे. खूप हायफाय आहेस.
ही भूमिका मातीशी जुळलेली होती. तू नाही करू शकणार. मी त्यांच्याकडे हे तीन आठवडे मागितले आणि नंतर रामगोपाल वर्मा यांच्या ऑफिसमध्ये गेलो. बाहेर ठेवलेल्या फुलदाणीमधील माती नखाला आणि केसांना लावली. बीडी ओढत त्यांच्या ऑफिसात गेलो आणि समोर बसलो. ते म्हणाले, की असे ऑडिशन आजपर्यंत कुणीच दिले नसेल. मी त्यांना सांगितले होते, की मी सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आहे.
'काल'साठी व्हिलचेअरवर राहिलो-
अशाप्रकारे 'क्रिश'मधील कालच्या पात्रासाठी मी एक महिन्यापूर्वी व्हिलचेअर घरी बोलावून घेतली होती. या सिनेमात मी केवळ मानच हालवू शकत होतो. म्हणून मी असा होमवर्क केला. 'शूटआऊट एट लोखंडवाला' सिनेमात मायाच्या पात्रासाठी पोलिसांचे कामकाज समजावून घेतले होते.

नेहमी शिकण्याची उत्सूकता ठेवा-
नेहमी काहीतरी शिकण्याची उत्सूकता असावी. आपल्या वाढत्या वयासोबत आपला अहंकारसुध्दा वाढत जातो. लहानांकडून शिकण्याची आपल्याला इच्छा नसते. ज्यादिवशी आपली शिकण्याची वृत्ती संपते, तेव्हा आपली प्रगती थांबते.
स्वत:ला विचारा डु आय डिजर्व्ह इट?
काही बनवण्यासाठी इच्छा असणे गरजेचे असते. सोबतच आपण यासाठी पात्र आहोत का हे पाहणेदेखील गरजेचे आहे. आधी स्वत:ला योग्य बनवा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विवेक ओबेरॉयचे PHOTOS...