आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress And Former Miss India Sonu Walia Turn 51 Year

B'day: वाढत्या वयामुळे आता अशी दिसतेय सोनू वालिया, बी ग्रेड सिनेमांमध्ये केले होते काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री सोनू वालियाची 1985 आणि 2014मधील छायाचित्रे)
मुंबईः 80 आणि 90च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी मॉडेल आणि अभिनेत्री सोनू वालिया आज आपला 51वा वाढदिवस साजरा करत आहे. 19 फेब्रुवारी 1964 रोजी दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात सोनू वालियाचा जन्म झाला. मॉडेलिंग क्षेत्रातून तिने आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत सोनूने 30हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
सोनूने सायकॉलॉजी या विषयात पदवी प्राप्त केली. याशिवाय तिने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली. सुरुवातीच्या काळात तिला या क्षेत्रात भरपूर यश मिळाले. यशोशिखरावर पोहोचण्यासाठी सोनू मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेतसुद्धा सहभागी झाली आणि 1985मध्ये तिने मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला. या स्पर्धेत अभिनेत्री जुही चावला हिने तिला मुकूट प्रधान केला होता. सोनू वालियापूर्वी जुही चावलाने हा मान पटकावला होता.
सौंदर्य स्पर्धेतील यशानंतर बी टाऊनमध्ये पदार्पण...
मॉडेलिंगमध्ये यशस्वी ठरल्यानंतर आणि मिस इंडियाचा किताब पटकावल्यानंतर सोनूला बॉलिवूडचा मार्ग खुणावू लागला. 1988मध्ये खून भरी मांग या सिनेमाच्या माध्यमातून ती पहिल्यांदा सिल्व्हर स्क्रिनवर अवतरली. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळाला. त्यानंतर ती 'आरक्षण', 'अपना देश पराए लोग', 'तूफान', 'खेल', 'स्वर्ग जैसा घर', 'तहलका', 'दिल आशना है' या सिनेमांसह ब-याच सिनेमांमध्ये झळकली. लीड अॅक्ट्रेस म्हणून ती फार यश मिळवू शकली नाही. सिनेमांसोबतच छोट्या पडद्यावरदेखील सोनू वालियाने काम केले आहे.
बी ग्रेड सिनेमांमध्ये केला अभिनय...
लीड अॅक्ट्रेसच्या रुपात यश मिळत नसल्याचे पाहून सोनूने बी ग्रेड सिनेमांमध्येही काम केले. त्यामुळे तिच्यावर बरीच टीकासुद्धा झाली. बॉलिवूडमध्ये अपयश पदरी येत असल्याने सोनूने लग्नाचा निर्णय घेतला. NRI सूर्य प्रकाशसोबत लग्न करुन तिने संसार थाटला. सूर्य प्रकाश यांच्या निधनानंतर तिने NRI निर्माते प्रताप सिंहसोबत दुसरे लग्न केले. आता ती यूएसमध्ये स्थायिक झाली असून अधूनमधून भारत भेटीवर येत असते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोनू वालियाची निवडक छायाचित्रे...