आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

44 वर्षीय Gorgeous ऐश्वर्यावरुन हटणार नाही तुमची नजर, घायाळ करणारी आहे मादक अदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  
मुंबईः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने नुकतीच वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरसुद्धा ऐश्वर्या पुर्वीएवढीच किंबहूना त्याहून अधिक सुंदर दिसतेय. खरं तर मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याचे वजन खूप वाढले होते. त्यामुळे तिच्यावर बरीच टीकासुद्धा झाली होती. तिच्यावर सतत होणा-या टीकांमुळे अभिषेक बच्चन दुखावला गेला होता. स्वतः अभिषेकने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला. याकाळात ऐश्वर्याने आपल्याला धीर दिल्याचे अभिषेकने सांगितले. 
 
अभिषेक म्हणाला, "ऐश्वर्या जेव्हा आई झाली तेव्हा ती करिअरपासून दूर गेली होती. आज ती आराध्यासाठी सगळे काही करते. अॅश सुपरमॉम आहे. आराध्याच्या जन्मानंतर अॅशचे वजन खूप वाढले होते, त्यावर खूप काही लिहिण्यात आले. त्या वेळी मला खूप वाईट वाटत होते. मात्र ती म्हणायची, जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा बदक परत येतील. या टीकांविषयी तिने कधीच तक्रार केली नाही, नाराजी व्यक्त केली नाही. मुळात तिने कधीही या प्रतिक्रिया मनावर घेत दिवसाचा जास्तीत जास्त वेळ जिममध्ये घालवला नाही. याउलट मी दुखावलो जात आहे, हे पाहून तिनेच मला धीर दिला होता."
 
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला ऐश्वर्याची जी छायाचित्रे दाखवत आहोत, ती बघून तिने वयाची चाळिशी ओलांडली यावर क्षणभर तुमचा विश्वासच बसणार नाही. 
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, ऐश्वर्याच्या घायाळ करणा-या अदा... 
बातम्या आणखी आहेत...