आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण होतीस तू काय झालीस तू... हिट सिनेमे देणा-या अमिषाची बघा आता काय झाली आहे अवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड या ग्लॅमर इंडस्ट्रीत कोण कधी यशोशिखरावर घेऊन जाईल आणि कधी कुणाला अपयशाला सामोर जावे लागेल, याचा काही नेम नाही. सततच्या अपयशाने व्यक्ती स्वतःलाही ओळखू शकणार नाही, अशी काहीशी अवस्था येथे काम करणा-या कलाकारांची होऊन जाते. असेच काहीसे घडले आहे अभिनेत्री अमिषा पटेलच्या बाबती. सध्याच्या काळात ती जी कामे करत आहे, ते बघून एकेकाळी ती बॉलिवूडमध्ये यशाची गॅरंटी होती, हे कुणीही म्हणणार नाही.
हृतिक हिट तर अमिषा ठरली फ्लॉप...
अलीकडेच अमिषा हृतिक रोशनच्या बर्थडे पार्टीत सहभागी झाली होती. हृतिकसोबतच अमिषाने आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला होता. 2000 मध्ये एक सिनेमा आला होता, त्याचे नाव होते 'कहो ना प्यार है'. या सिनेमाने तरुणांना अक्षरशः वेड लावले होते. या सिनेमाने अभिनेता हृतिक रोशनला एका रात्रीत स्टार बनवले, तर अमिषा पटेल या नवोदीत चेह-यालासुद्धा बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख प्राप्त करुन दिली. आज हृतिक सुपरस्टार आहे, मात्र अमिषा हळूहळू आपली ओळख विसरत चालली आहे. अमिषा आता हळूहळू ग्लॅमर इंडस्ट्रीबाहेर फेकली जात आहे.
प्रसिद्धीझोतात राहण्याचा असतो प्रयत्न...
गेल्या काही वर्षांपासून तिच्याकडे सिनेमे नाहीत. छोट्या मोठ्या भूमिका साकारुन ती आपला वेळ काढत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता अमिषाला जेव्हाही पार्टीत जाण्याची संधी मिळते, तेव्हा ती सर्वांसोबत फोटो काढून आणि ट्विट करुन स्वतःला स्टार असल्याचे भासवत आहे.
अलीकडेच सलमान खान आणि हृतिक रोशनच्या बर्थडे पार्टीत अमिषा दिसली होती. येथे ती ज्या रुपात दिसली ते बघून 15 वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत पदार्पण केलेली हीच ती अमिषा आहे, यावर क्षणभर विश्वास बसला नाही. सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पार्टीत सहभागी झालेल्या लोकांसोबत जवळीक साधून ती फोटो काढताना आढळून आली होती.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, एकेकाळच्या या हिट अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याविषयी आणि सोबतच जाणून घ्या आता कशी झाली आहे तिची अवस्था...