आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 'देवसेना'वरुन हटत नाही बघणा-याची नजर, अनुष्काचा 'बाहुबली 2'मधला हा लूक वेधतो लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऊथ फिल्म इंडस्ट्रीची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. याचवर्षी अनुष्काचा ‘बाहुबली 2’ हा सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमाने एक हजार कोटींहून अधिकचा गल्ला जमवून भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. एवढी कमाई करणारा हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. या सिनेमातून कटप्पाने बाहुबलीला का मारले? याचे उत्तर मिळाले असून देवसेना आणि अमरेंद्र बाहुबली यांची लव्हस्टोरी बघायला मिळाली आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात देवसेनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी म्हाता-या स्त्रीच्या रुपात दिसली होती. मात्र बाहुबली 2मध्ये देवसेनाचे तरुण रुप बघायला मिळाले आहे. एका राज्याची राजकुमारी ते अमरेंद्र बाहुबलीची प्रेयसी, पत्नी अशी भूमिका तिने वठवली आहे. देवसेनाचं शौर्य आणि सौंदर्य ‘बाहुबली 2’मध्ये लक्ष वेधून घेणारे आहे. देवसेनाची भूमिका वठवणारी अनुष्का शेट्टी सिनेमात लक्षात राहते. 

आज अनुष्काच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाहुयात,  ‘बाहुबली 2’मधील अनुष्काचा घायाळ करणारा अंदाज...
बातम्या आणखी आहेत...