आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे ही अॅक्ट्रेस, जाणून घ्या काय करतेय सध्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी अजूनही तशाच दिसतात जशा त्या 30-35 वर्षांपूर्वी दिसत होत्या. शनिवारी एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे एवढ्या वर्षांनंतरही त्यांचे सौंदर्य, फिटनेस चेहऱ्यावरील जेत हे तसेच आहे जसे पूर्वी होते. 17 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर असलेल्या अरुणा इराणी फिटनेसची खूप काळजी घेतात.

सध्या काय आहे सुरू..
- अरुणा इराणी यांनी बोलताना सांगितले की, मी 16-17 वर्षे इंडस्ट्रीपासून दूर आहे आणि आता टिव्ही वर काम करतेय. या काळात मला मनासारख्या भूमिका मिळाल्या नाहीत म्हणून काम केले नाही असे त्या म्हणाल्या.
- सध्याच्या चित्रपटांवर बोलण्यास त्यांनी नकार दिला. आजही चांगले चित्रपट येतात पण मी जुन्या विचारांची आहे, असे त्या म्हणाल्या.
- टिव्ही वर काम केल्यामुळे जास्त प्रसिद्धी मिळाली असे वाटत असल्याचेही अरुणा इराणी म्हणाल्या.
- कॉमेडी आणि ओव्हर-इमोशनल रोल करायला अधिक आवडत असल्याचे त्या म्हणाल्या.
वडील चालवायचे ड्रामा कंपनी..
- अॅक्टींग आणि डान्स काहीही शिकले नाही, वेळेबरोबर सर्व जमले असे अरुणा इराणी यांनी सांगितले.
- वडील एक ड्रामा कंपनी चालवायचे त्यामुळे अॅक्टींमध्ये फार त्रास जाला नाही असेही त्या म्हणाल्या.
- रिहर्सलच्या वेळी ते मला पहिल्या रांगेत बसून सर्व महिला कलाकारांचे डायलॉग पाठ करायला सांगायचे. मीही तसेच करायचे.
- एखादी अॅक्टर सुटीवर गेली की, मला तिच्या जागी अॅक्टींगला उभे करायचे.
- मास्टर्सने मला मारून मारून डान्स करायला शिकवले, असेही त्या म्हणाल्या.

पुढे पाहा, अरुणा इराणी यांचे काही निवडक PHOTOS.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...