आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडलिंगच्या दिवसांत अशी दिसायची बिपाशा, बालपणी लोक म्हणायचे\'लेडी गुंडा\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मॉडेलिंगकडून अभिनय क्षेत्राकडे वळलेली बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसातच्या निमित्ताने तिची बहीण विजेताने बिपाशाचा एक रेअर फोटो शेअऱ केला आहे.  7 जानेवारी 1979 रोजी दिल्लीत तिचा जन्म झाला. बिपाशाचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील नेहरु प्लेसस्थित एपीजे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय कोलकातामध्ये शिफ्ट झाले.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001मध्ये 'अजनबी' या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2002 मध्ये रिलीज झालेला 'राज' हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. या सिनेमासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत तिला नामांकन मिळाले होते. त्यानंतर 2005 मध्ये आलेला नो एन्ट्री हा सिनेमासुद्धा हिट ठरला होता. बिपाशाने आत्तापर्यंत जवळजवळ 55 सिनेमांमध्ये अभिनय केला.  
 
बालपणी लठ्ठ आणि सावळी होती बिपाशा...
आज बिपाशाची गणना सेक्सी आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये होते. मात्र बालपणी बिपाशा सावळी आणि बरीच लठ्ठ होती. एकदा बिपाशाने सांगितले होते, की तिच्या शॉर्ट आणि कमांडिंग पर्सनॅलिटीला बघून लोक तिला घाबरायचे. प्रेमाने लोक तिला लेडी गुंडा म्हणायचे.
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, बिपाशा बसूचे मॉडलिंग डेजचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...