आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साजिदची दुसरी पत्नी होती दिव्या भारती, आजही गुलदस्त्यातच आहे मृत्यूचे रहस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिनेत्री दिव्या भारती)
मुंबई- बॉलिवूडमध्ये 90च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री दिव्या भारतीने 5 एप्रिल 1993 रोजी या जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडलेले नाहीये. 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या दिव्या भारतीने हिंदी सिनेमांव्यतिरिक्त तामिळ आणि तेलगु सिनेमांतही काम केले होते. शोला और शबनम, दिल आशना आणि दिवानासारख्या हिट सिनेमांनी तिला बॉलिवूडमध्ये स्थापित केले. जाणून घेऊया या अभिनेत्रीविषयी...
दिव्या भारतीचा मृत्यू आजसुध्दा एक रहस्य आहे-
5 एप्रिल 1993 रोजी रात्री 11 वाजता मुंबईच्या वारसोवा स्थित तुलसी अपार्टमेंटच्या 5व्या मजल्यावरून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. मृत्यूवेळी तिचे वय 19 वर्षे होते. दिव्याने आत्महत्या केली होती, की तिचा खूण करण्यात आला होता, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. कारण पोलिसांकडे या प्रकरणात एकही पुरावा मिळाला नाही.
दिव्यासाठी अशुभ ठरला विवाह-
असे सांगितले जाते, की दिव्या भारती खूप नशीबवान होती. कारण ती जो सिनेमा साइन करत होती, तो हिट जात होता. यशोशिखरावर पोहचत असतानाच तिने निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत लग्न थाटले. परंतु हे लग्न तिच्यासाठी अशुभ ठरले. लग्नानंतर काही माहिन्यातच तिचा रहस्यमयी मृत्यू झाला.
अनेक निर्मात्यांना सिनेमांत काम करण्याचा दिला होता शब्द-
दिव्या भारतीने अनेक निर्मात्यांना त्यांच्या सिनेमांत काम करण्याचा शब्द दिला होता. परंतु ती शब्द पूर्ण करू शकली नाही. त्या सिनेमांमधील 'लाडला' एक होता. दिव्याच्या मृत्यूनंतर श्रीदेवीने या सिनेमात काम केले होते. कारण तिचा चेहरा श्रीदेवीशी मिळता-जुळता होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्या भारतीचे काही खास फोटो...