मुंबईः मेक इन इंडिया वीक मुंबईत सुरु आहे. 18 फेब्रुवारीपर्यंत चालणा-या या इन्व्हेस्टमेंट मीटमध्ये 60 देशांतील डेलिगेशन सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रात असे अनेक मोठे बिझनेसमन आहेत, ज्यांचा व्यवसाय देशभरात पसरला आहे. यापैकीच एक आहेत रिअल इस्टेट टायकून विकास ओबरॉय. जाणून घेऊयात त्यांच्याविषयीच्या खास गोष्टी...
अब्जाधीश आहेत विकास ओबरॉय
- रिअल इस्टेट टायकून विकास ओबरॉय यांचे मुंबईत अनेक रिअल इस्टेट फर्म आहेत.
- त्यांची गुंतवणूक सुमारे 53 अब्ज आहे.
- त्यांची पत्नी अभिनेत्री गायत्री जोशी ही फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट आहे.
- आता गायत्रीसुद्धा व्यवसायाकडे लक्ष देते.
देशभरात अनेक प्रोजेक्ट...
- विकास ओबरॉय ओबरॉय रिअॅलिटीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.
- त्यांचे मुंबईत 40 हून अधिक कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट्स आहेत.
- विकास यांनी हॉवर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केले आहेत.
- मुंबईव्यतिरिक्त गोव्यात त्यांचे अनेक प्रोजेक्ट्स सुरु आहेत.
2005 मध्ये लग्न
- विकास आणि गायत्री यांचे लग्न 2005 मध्ये लास वेगास येथे झाले होते.
- लग्नानंतर गायत्रीने अभिनयाला रामराम ठोकला.
- या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पहिल्या मुलाचा जन्म 1 सप्टेंबर 2006 रोजी तर दुस-या मुलीचा जन्म 27 ऑगस्ट 2010 मध्ये झाला.
गायत्री जोशी-ओबरॉयने शाहरुखसोबत केलंय काम
-गायत्रीने 2004 मध्ये आलेल्या आशुतोष गोवारिकरांच्या स्वदेश या सिनेमात काम केले होते.
- या सिनेमात बॉलिवूडचा किंग शाहरुख खान तिचा हीरो होता.
- सिनेमात गायत्रीने शिक्षिकेची भूमिका वठवली होती.
- या सिनेमासाठी गायत्रीने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते.
- 2004 मध्ये तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गायत्री आणि विकास ओबरॉय यांची खास छायाचित्रे...