आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या अभिनेत्रीचा आशिर्वाद घेण्यासाठी येतात लोक, आमिरसोबत काम करून झाली होती फेमस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेसी सिंह सध्या 'संतोषी मां' टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. - Divya Marathi
ग्रेसी सिंह सध्या 'संतोषी मां' टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
लखनौ: 'लगान' सिनेमात आमिर खानच्या अपोझिट काम केलेली अभिनेत्री ग्रेसी सिंह सध्या 'जय संतोषी मां' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. शोच्या प्रमोशनसाठी ग्रेसी राजस्थानला आली होती. त्यादरम्याने तिने 'संतोषी मां' शोचा अनुभव शेअर केला.
आशिर्वाद घेण्यासाठी येतात लोक...
- 'जय संतोषी मां'च्या भूमिकेविषयी ग्रेसी सांगते, 'ही भूमिका आव्हानात्मक होती. एक व्यक्ती असून देवाची भूमिका साकारणे कठिण होते.'
- 'मी जेव्हापासून ही भूमिका करतेय, तेव्हापासून स्वत:मध्ये एक वेगळीच शक्ती असल्याचा भास होतोय.'
- 'मी ब्रम्हकुमारीची सदस्य आहे. कधीकधी अशा लोकांची भेट होते, ज्यांच्यामध्ये आध्यात्मिक शक्ती जाणवते. असे वाटते, ते देवच आहेत. त्यांच्यात काहीतरी स्पिरिचुअल पॉवर आहे.'
- ग्रेसीने सांगितले, की संतोषी मांच्या भूमिकेने लोक तिचा आशिर्वाद घेण्यासाठी येतात. ती त्यांना आशिर्वादसुद्धा देते.
लग्नाचे कोणतेच प्लानिंग नाहीये...
- 'लगान' आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस'सारख्या हिट सिनेमांत मुख्य भूमिका साकारणारी ग्रेसी सिंह सांगते, 'मी कधीच सिनेमांच्या मागे धावले नाही. जे पात्र मिळाले, त्यात बेस्ट देण्याचा प्रयत्न केला.'
- लग्नाविषयी ग्रेसी सांगते, 'सध्या मी लग्न करण्याचा विचार केला नाहीये. मात्र घरच्यांची इच्छा आहे, की मी लग्न करून सेटल व्हावे. परंतु मी सध्या त्यासाठी तयार नाहीये.'
- 'प्रत्येक व्यक्तीने आपल्या वर्तमानवर लक्ष द्यावे. उद्या काय होणार याकडे लक्ष देऊ नये'
श्रीदेवी आणि माधूरीचे सिनेमे पाहून झाली मोठी...
- ग्रेसी सांगते, 'मी श्रीदेवी आणि माधूरीचे सिनेमे पाहून मोठी झाले. 'लम्हे' सिनेमात श्रीदेवीने साकारलेली भूमिका मला खूप आवडते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ग्रेसीचे ग्लॅमरस PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...