आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसने धर्मेंद्र, सनी देओलसोबत केलेय काम, असे आहे खासगी आयुष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री कुलराज रंधावाने - Divya Marathi
अभिनेत्री कुलराज रंधावाने
चंदीगढ: अभिनेत्री कुलराज रंधावाला सिनेमातील भूमिका किती लांब आहे, यापेक्षा जास्त तिची सिनेमात उपस्थिती किती वेळ आणि वेळा आहे, याची चिंता असते. ती परफॉर्मन्सवर भर देते. एका कार्यक्रमानिमित्त ती चंदीगढमध्ये आली होती. त्यावेळी तिने करिअर आणि पर्सनल लाइफविषयी रंजक गोष्टी divyamarathi.comसोबत शेअर केल्या.
असे भेटले अभिनेत्री म्हणून काम...
- कुलराजचा जन्म 16 मे 1980ला देहरादूनमध्ये झाला. तिचे वडील पोलिस विभागात नोकरी करतात.
- तिने 'यमला पगला दीवाना' सिनेमात धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओलसोबत काम केले. ती या सिनेमात मुख्य अभिनेत्री होती.
- सर्वप्रथम ती झी टीव्हीच्या 'करीना करीना' मालिकेत दिसली होती. त्यातूनच तिला ओळख मिळाली.
- त्यानंतर तिने 'मन्नत' आणि 'तेरा मेरा की रिश्ता' या पंजाबी सिनेमांत काम केले. तिचे हे दोन्ही पंजाबी सिनेमे हिट झाले.
- अभिनेत्री आणि मॉडेल कुलराज रंधावा, 'जाने भी दो यारो', 'चिंटुजी'सारख्या बॉलिवूड सिनेमांत काम केले आहे.
फ्रेंडच्या सांगण्यावरून दिले होते ऑडिशन...
- कधीच अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता. शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी करण्याचा मानस होता.
- नशीबाने अभिनयाकडे वळवले. एका फ्रेंडने टीव्ही शोसाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला.
- फ्रेंड म्हणाला, तू मॉडेलसारखी दिसतेस, टीव्ही किंवा सिनेमांत काम मिळवण्याचा प्रयत्न कर.
- डोळे आणि हावभावांमुळे निवडले. अभिनेत्री म्हणून माझ्या करिअरची सुरुवात झाली.
असे आहे खासगी आयुष्य...
- खासगी आयुष्याविषयी कुलराज सांगते, जर अभिनय आणि रिअल लाइफविषयी बोलायचे झाले तर मी कंटेंट पर्सन आहे.
- माझे खूप मोजके फ्रेंड्स आहेत. त्यांनाच मी माझ्या गोष्टी शेअर करते.
- मी कुणात मिसळत नाही. फ्रेंड्सशिवाय इतर कुणाला भेटले तर स्वत:ला ग्रुम करण्याचा प्रयत्न करते.
- फन फॅक्टर, नॉलेज आणि सवयी सर्व मर्यादीत आहेत. तसेच प्रत्येक गोष्टीत समाधानी असते. लवकरच सीरिअस होत नाही. नॅच्युरल कॉमिक टाइमिंग आहे.
- नेहमी आनंददायी राहण्याचा प्रयत्न करते. फॅशनमध्ये कॅज्युअल विअर आवडते.
- तिला पुस्तक, बॅग, घड्याळ जमा करायला आवडते. शिवाय बालपणीपासून इंग्लिश फिक्शनची आवड आहे.
- ती सर्वात जास्त सेन्सिबल हॉरर पुस्तके वाचते. तिने सांगितले, की ती आजकाल शूटिंगसोबत स्वत:चे लिखाणसुध्दा करत आहे.
छोट्या-मोठ्या भूमिकने फरक पडत नाही...
- कुलराजने सिनेमांत तिची आवड आणि बॉलिवूड कलाकारांचे पंजाबी इंडस्ट्रीशी जुळण्याविषयी सांगितले.
- कुलराज म्हणाली, 'माझ्यासाठी सिनेमाची कथा महत्वाची असते. ती फक्त दमदार असायला हवी.'
- भूमिका मोठी असो अथवा लहान, मला त्याचा फरक पडत नाही. एक स्क्रिप्ट दाखवणे दिग्दर्शकाचे काम असते.
- जर दिग्दर्शक असे करू शकला तर सिनेमा हिट होईल.
- कुलराज म्हणाला, 'पंजाबी सिनेमाचा स्तर वाढू लागला आहे. येथील प्रेक्षकांचीसुध्दा एक वेगळी संख्या आहे.'
- अनेक पंजाबी सिनेमांनी सिनेसृष्टीत वेगळी ओळख मिळवली आहे.
- अनेक रेकॉर्ड रचले आहेत. त्यामुळे बॉलिवूड कलाकारसुध्दा पंजाबी सिनेमांत येत आहेत.
पोलका डॉट्स नावाच्या एंटरटेन्मेंट कंपनीची मालकिन आहे रंधावा...
- कुलराजने सांगितले, की एक कलाकार म्हणून नेहमी लक्षात ठेवायला हवे, की तुम्ही अर्थिकृष्ट्या मजबूत आहात. जसे, मी स्वत:ची एंटरटेन्मेंट कंपनी चालू केलीये.
- 2010मध्ये मी पोलका डॉट्स कंपनी सुरु केली. माझा उद्देश चांगला सिनेमा करण्याचा आहे. म्हणून काम आणि चांगला सिनेमा दोघांना वेळ देतेय.
सिनेमानिमित्त नवीन गोष्टी माहित झाल्या...
- मी फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा विचारदेखील केला नव्हता.
- एका कलाकाराने चांगला परफॉर्मर बनावे. जर कहाणी दमदार असेल तर ती साकारण्यास मागेपुढे पाहू नये.
- मग तो प्रोजेक्ट एखाद्या नवीन दिग्दर्शक आणि निर्मात्याचा असला तरी चालेल. मी एक महिला केंद्रीत सिनेमा करत आहे.
- हा सिनेमा एका अशा महिलेवर आधारित आहे, जी वेळेसोबत लढते.
- आतापर्यंत मी अशी भूमिका पाहिली नव्हती, तेही एखाद्या नवीन दिग्दर्शकासोबत. या सिनेमातून मला नवनवीन शिकायला मिळाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कुलराज रंधावाचे ग्लॅमरस फोटो...
बातम्या आणखी आहेत...