आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: ही अॅक्ट्रेस आहे धोनीची एक्स-गर्लफ्रेंड, जाणून घ्या हिच्याविषयी बरंच काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची एक्स गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणारी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मी राय हिचा आज वाढदिवस आहे. 5 मे 1989 रोजी बंगळूरूमध्ये जन्मलेल्या लक्ष्मीने करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली. अनेक जाहिरातींमध्ये लक्ष्मी झळकली आहे. 2005 साली 'कारका कसडारा' या सिनेमातून तिने साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर ती 'मुनि 2- कांचा', 'मनकथा', 'रॉक एन रोल', 'अन्नान थम्बी', 'हरिहर नगर', 'अन्नान थम्बी', 'नेकू-नाकू', 'मिन्चिना ओटा', 'धाम-धूम', 'राजधानी राजा'सह अनेक सिनेमांमध्ये झळकली. लक्ष्मीने बॉलिवूड इंडस्ट्रीतसुद्धा एन्ट्री घेतली आहे.  ए. आर. मुरुगदास यांच्या 'अकीरा' या सिनेमात ती झळकली होती. आता 'ज्युली 2' या बॉलिवूड सिनेमात ती झळकणार असल्याची चर्चा आहे.  
 
महेंद्रसिंग धोनीसोबतच्या अफेअरमुळे आली होती चर्चेत... 
काही वर्षांपूर्वी धोनी आणि लक्ष्मी यांच्या अफेयरच्या अनेक बातम्या आल्या होत्या. 2008 मध्ये आयपीएल दरम्यान लक्ष्मी आणि धोनीच्या डेटींगच्या बातम्या होत्या. धोनीने मात्र या बातम्या फेटाळल्या होत्या. त्यानंतर दोघांचे नाते संपले. पण लक्ष्मीला प्रत्येक ठिकाणी याबाबतच विचारणा होऊ लागल्याने, मुलाखतीत तिने याबाबत टोकाचे मत व्यक्त केले होते.
 
काय म्हणाली होती लक्ष्मी... 
लक्ष्मी म्हणाली होती, की मी आणि धोनी यातून बाहेर निघालो आहोत. लोक मात्र अजूनही त्याठिकाणी अडकलेले आहेत. या गोष्टीला आता 8 वर्षे लोटली आहेत. मी तेव्हा टीमची ब्रँड अॅम्बेसेडर होती. तो टीममध्ये असल्याने आम्ही एका वर्षापेक्षाही कमी काळ सोबत होतो. आम्ही कधीही एकमेकांना कमिटमेंट दिले नव्हते आणि लग्नाचा विषयही काढला नाही.  
 
आमचे नाते एखाद्या डागाप्रमाणे..
काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राशी चर्चा करताना लक्ष्मी राय म्हणाली होती, की एवढ्या दिवसांनंतरही धोनीचे नाव निघाले की माझे नाव घेतले जाते. आजही आमच्या रोमान्सच्या अफवा उडतात. मला या सर्वांचा राग येतो. आमचे नाते एखाद्या डागाप्रमाणे वाटत आहे, असेही ती म्हणाली होती. धोनीनंतरही माझे तीन चार जणांशी नाते होते, पण त्याबाबत कोणी विचारत नाही, असेही ती म्हणाली.
 
आता या तरुणाच्या पडली आहे प्रेमात..  
लक्ष्मी राय आता बॉलिवूड कोरिओग्राफर आणि मॉडेल हनीफ हिलालला डेट करतेय. हनीफने त्याचे नाव बदलून आता वीर आर्यन असे ठेवले आहे. वीर आर्यनचे लक्ष्मीपूर्वी पूजा बेदी आणि करिश्मा तन्नासोबत नाव जुळले होते. वीरने विक्रम भटच्या ‘माया’ या वेब सीरीजमधून अॅक्टिंग डेब्यू केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचे काही PHOTOS
 
बातम्या आणखी आहेत...