(फोटोत उजवीकडून पती हरीश मैसूर, मुलगी केंद्र, मुलगा जोश यांच्यासोबत मिनाक्षी शेषाद्री)
मुंबईः अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हे नाव परिचयाचे नसलेला एकही प्रेक्षक शोधून सापडणार नाही. मीनाक्षीमध्ये सौंदर्य आणि अभिनयाचा मिलाफ होता. भरतनाट्यम्, कुचिपुडी, कत्थक, ओडिसी यासारख्या शास्त्रीय नृत्यांत पारंगत असलेल्या मीनाक्षीने वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. राजकुमार संतोषी यांच्या 'घायल' या सिनेमातून तिने उत्कृष्ट अभिनयाचा नमुना सादर केला. आता 'घायल रिटर्न्स' या सिनेमातून मीनाक्षी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याची बातमी आहे.
Divyamarathi.com
आपल्या वाचकांना मिसींग सीरिजच्या माध्यमातून अशा अभिनेत्रींविषयी सांगणार आहे, ज्या 80-90 च्या दशकात प्रसिद्धीझोतात होत्या. मात्र अचानक त्या बॉलिवूडमधून अज्ञातवासात निघून गेल्या. याच अभिनेत्रींच्या यादीत मीनाक्षीच्या नावाचाही समावेश आहे.
आता अमेरिकेत वास्तव्याला आहे मीनाक्षी
इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूर याच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर मीनाक्षीने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. मुलगी केंद्रा आणि मुलगा जोश, या दोन मुलांची आई असलेली मीनाक्षी अमेरिकेतील टेक्सासमधील प्लॅनो येथे राहते. हरीशसोबत मीनाक्षीने न्यूयॉर्क येथे रजिस्टर्ड मॅरेज केले होते. आता ती येथे डान्स अकॅडमी चालवते.
वयाच्या 17 व्या वर्षी बनली होती मिस इंडिया
16 नोव्हेंबर 1963 रोजी धनबाद येथे जन्मलेल्या मीनाक्षीने वयाच्या 17 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. मीनाक्षीने 1982 साली ‘पेंटर बाबू’तून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. या सिनेमात तिचा नायक मनोजकुमार यांचा भाऊ राजीव गोस्वामी हा होता. मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती 'हीरो' या सिनेमाने. यामध्ये जॅकी श्रॉफ तिचा हीरो होता. आपल्या फिल्मी करिअरमध्ये मीनाक्षीने 'मेरी जंग', 'घर हो तो ऐसा', 'घायल', 'दामिनी', 'घातक' यांसारख्या अविस्मरणीय सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
राजकुमार संतोषी यांच्यासोबत जुळले मीनाक्षीचे नाव
एकेकाळी मीनाक्षीचे नाव दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत जुळले होते. राजकुमार संतोषी यांच्या अधिकाधिक सिनेमांमध्ये मीनाक्षीने काम केले आहे. संतोषी यांनी तिच्याकडे आपल्या प्रेमाची कबुलीसुद्धा दिली होती. मात्र तिने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नव्हता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मीनाक्षी शेषाद्रीची तिच्या कुटुंबीयांसोबतची छायाचित्रे...