आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 100 रुपये घेऊन मुंबईत आली होती ही अभिनेत्री, रात्री राहायची स्टेशनवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- फिल्म प्रोड्यूसर, अभिनेत्री आणि मॉडेल नेहा बंसलने मुंबईमध्‍ये 8 जूनला वाढदिवसानिमित्‍त फिल्म 'क्राइम अफेयर' व 'बदला' च्‍या यशानंतर एका पार्टीचे आयोजन केले आहे. हरियाणाच्‍या कॅथलमध्‍ये जन्‍मलेल्‍या नेहा बंसलने कैक भोजपुरी चित्रपटांमध्‍ये काम केले आहे. शिवाय तिने हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्‍येही काम केले आहे. स्टेशनवर झोपून काढल्‍या अनेक रात्री..
- नेहाने एका मुलाखतीत सांगितले होते, ती 13 वर्षांपूर्वी 100 रुपये घेऊन घरुन निघाली होती.
- तिने असेही सांगितले होते, ती हरियाणाच्‍या कॅथलमधून मुंबईत विना तिकीटाने आली होती.
- नेहाने सांगितले मुंबईत राहण्‍यासाठी तिच्‍याकडे कोणताच आधार नव्‍हता. ना कुणाची ओळख.
- त्‍यामुळे तिला रात्री स्‍टेशनवर राहावे लागत होते.
13 वर्षांपासून मुंबईत राहत आहे..
- नेहा 13 वर्षांपासून मुंबईमध्‍ये राहते. सुरुवातीला मॉडेलिंग नंतर ती चित्रपटाकडे वळली.
- तिने सांगितले की, मॉडेलिंग करताना तिचे चित्रपटात कधी पदार्पण झाले तिला कळाले नाही.
- मुंबईमधील संघर्षासाठी तिला तिच्‍या मित्रांनी भरपूर सहकार्य केल्‍याचे ती सांगते.
- नेहाने आतापर्यंत पाच चित्रपटांमध्‍ये काम केले. त्‍यामध्‍ये दोन भोजपुरी 'चंद्रिका' आणि 'अम्बा के सती' आणि तीन हिंदी चित्रपट 'ढूंढ लेंगे मंजिल हम', 'डेजी विल्ला' आणि 'सनून' हे आहेत.
- या यशानंतर तिने एनबी इंटरटेनमेंट नावाने प्रोडक्शन कंपनी सुरू केली.
- मुंबईला येण्‍याआधी नेहा कॅथलच्‍या आरकेएसडी कॉलेजमध्‍ये ग्रॅज्युएशन करत होती.
- ती बीए प्रथम वर्षाला होती. मात्र, अभिनयाच्‍या छंदामुळे शिक्षण सोडून तिने मुंबई गाठली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, नेहा बंसलचे इतर काही खास फोटो..
बातम्या आणखी आहेत...