Home »TV Guide» Actress Nia Sharma Offered 2 Cr To Participate In Bigg Boss 11

Buzz : बिग बॉस-11 मध्ये येण्यासाठी या अभिनेत्रीला ऑफर झाले 2 कोटी रुपये

दिव्य मराठी वेब टीम | Aug 12, 2017, 17:21 PM IST

मुंबई - बिग बॉस 11 वा सीजन लवकरच सुरु होणार आहे. 10 व्या सीजनप्रमाणे यावेळीही सेलिब्रेटी आणि नॉन सेलिब्रेटी या शोमध्ये दिसणार आहेत. सेलिब्रेटींबाबत बोलायचे झाले तर या सीजनमध्ये जमाई राचा ची अभिनेत्री निया शर्मा दिसण्याची शक्यता आहे. अशी माहिती मिळते की बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी नियाला 2 कोटी रुपये मिळाले आहेत. यावर नियाला विचारले असता तिच्याकडून काही माहिती मिळाली नाही. नीया सध्या 'खतरों के खिलाडी 8' मध्ये काम करत आहे. यावेळी नॉन सेलिब्रेटींना नाही मिळणार फिस..
- मागील सीजनप्रमाणेच या सीजनमध्येही सेलिब्रेटी आणि नॉन सेलिब्रेटी स्पर्धक असणार आहेत. पण यावेळी नॉन सेलिब्रेटींसाठी एक दुःखद बातमी आहे की त्यांना फिस मिळणार नाही.
- मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांनी सोशल मीडियावर त्यांची ओळख मिळवली आहे त्या नॉन सेलिब्रेटी लोकांना काही ना काही रक्कम दिली जाईल पण घरात प्रवेश घेण्यासाठी फिस मिळणार नाही.
- टीआरपी वाढविण्यासाठी जोही नॉन सेलिब्रेटी मदत करेल त्याला खास रक्कम दिली जाईल.
सलमानने शूट केला प्रोमो..
- मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान दुबईत 'टाइगर जिंदा है' चे शूटिंग करत आहे. पण 'बिग बॉस 11' च्या प्रोमो शूटसाठी तो मुंबईला आला होता.

लोपामुद्रा आणि बानी करु शकतात शो होस्ट..
- मिळालेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस 10' ची कंटेस्टंट लोपामुद्रा राऊत आणि वीजे बानी सीजन 11 मध्ये दिसणार आहेत. पण यावेळी त्या सहभागी नाही तर शो होस्ट करणार आहेत.
- सलमानशिवाय लोपामुद्रा आणि बानी काही सेगमेंट होस्ट करु शकतात. यावेळी त्या घरातून बेघर झालेल्या सहभागींशी चर्चा करताना दिसतील.

डॉक्टरांच्या तपासणीनंतर मिळणार बिग बॉस घरामध्ये एंट्री...
- मिळालेल्या माहितीनुसार, घरात सहभागी होण्यासाठी पहिले डॉक्टरांची तपासणी आवश्यक आहे. ते यासाठी की घरात गेल्यानंतर कोणी आजारपणाचा फायदा घेऊ नये.
- यासाठी चॅनलकडून काही डॉक्टर्स बोलवले जाणार आहेत. ज्यांच्या हेल्थ सर्टीफिकेटनंतरच सहभाग घेता येणार आहे.
पुढच्या स्लाईडवर वाचा, हे असू शकतात बिग बॉस-11चे संभाव्य कंटेस्टंट..

Next Article

Recommended