आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या फिल्ममध्ये काम करुन 'सेक्स सिम्बॉल' ठरली होती ही अॅक्ट्रेस, आता दिसले अशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः निशा कोठारी अशी एक अॅक्ट्रेस आहे, जी अभिनयापेक्षा डायरेक्टर रामगोपाल वर्मासोबतच्या जवळीकीमुळे जास्त चर्चेत होती. अनेक सिनेमांमध्ये आयटम नंबर करणारी निशा दीर्घ काळानंतर दिल्लीत पार पडलेल्या सेलिब्रिटींच्या फुटबॉल मॅचमध्ये दिसली. यावेळी निशा एथनिक रुपात बाबा रामदेव यांच्यासोबत दिसली. पूर्वीपेक्षा निशाचे आता बरेच वजन वाढलेले दिसले. एक काळ असा होता, जेव्हा निशाची गणना बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये व्हायची. 'चढती जवानी मेरी चाल मस्तानी'मधून मिळाली होती ओळख...
निशाचे खरे नाव प्रियांका कोठारी आहे. 30 नोव्हेंबर 1983 रोजी वाराणसीत तिचा जन्म झाला. निशा दहावीत असताना तिचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. निशाला 2002 मध्ये आलेल्या 'चढती जवानी मेरी चाल मस्तानी' या म्युझिक व्हिडिओतून ओळख प्राप्त झाली होती. त्यानंतर 2003 मध्ये तामिळ फिल्म 'जय जय'द्वारे तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये तिची एन्ट्री 2005 मध्ये आलेल्या 'सरकार' या सिनेमातून झाली होती.
'जेम्स' सिनेमामुळे बसला सेक्स सिम्बॉलचा ठपका....
2005 मध्ये निशाचा 'जेम्स' हा सिनेमा रिलीज झाला होता. अभिनेता मोहित अहलावतने या सिनेमात निशासोबत काम केले होते. या सिनेमामुळे निशाला सेक्स सिम्बॉल म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर इम्रान हाश्मीसोबत ती 'द किलर' या सिनेमात झळकली. 'डरना जरूरी है', गो, डॉर्लिंग, आग, अज्ञात आणि बिन बुलाए बराती हे तिचे काही निवडक बॉलिवूड सिनेमे आहेत. मध्यंतरी निशा कोठारीने तामिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, अॅक्ट्रेस निशा कोठारीचे पुर्वी आणि आत्ताचे काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...