आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगदरम्यान सर्वांसमोर सरकला या अॅक्ट्रेसचा ड्रेस, तमन्नाने वाचवली अब्रू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः नोरा फतेही)
मुंबईः दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आगामी 'बाहुबली' या सिनेमाच्या प्रमोशनल साँगमध्ये फॉरेन ब्युटी नोरा फतेही झळकणार आहे. या गाण्याचे शूटिंग सुरु असताना ती सेटवर वार्डरोब मालफंक्शनला बळी पडताना थोडक्यात बचावली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथे नोरा गाण्याचे शूटिंग करत होती. तेव्हा अचानक तिचा टॉप खाली सरकला. कॅमेरा ऑन होता आणि सेटवर बरेच क्रू मेंबर्स उपस्थित होते. सिनेमाची लीड अॅक्ट्रेस तमन्ना भाटियासुद्धा त्यावेळी तिथे हजर होती. नोराचे वार्डरोब मालफंक्शन होत असल्याचे लक्षात येताच तमन्ना तिच्या बचावासाठी पुढे आली.
स्वतः नोराने तिच्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी सांगितले. ती म्हणाली, ''तो खूप भीतीदायक क्षण होता. मी तमन्नाचे आभार मानते, की ती क्षणाचाही विलंब न लावता, माझ्या मदतीला धावून आली.''
कोण आहे नोरा फतेही
नोरा फतेही मोरक्कन वंशाची अभिनेत्री आहे. 2014 मध्ये दिग्दर्शक कमल सदाना यांच्या 'रोर : टाइगर्स ऑफ द सुंदरवन' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'क्रेजी कुक्कड फॅमिली' आणि 'मिस्टर एक्स' या सिनेमांमध्येही ती झळकली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, नोरा फतेहीची निवडक छायाचित्रे...