आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: पहिल्याच सिनेमात पूनम यांनी परिधान केला होता स्विमसूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री पूनम ढिल्लन)
मुंबईः आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लन यांना आजवर प्रेक्षकांनी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या आणि छोट्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 53 वर्षीय पूनम यांचा आज वाढदिवस आहे. 18 एप्रिल 1962 रोजी कानपूरमध्ये जन्मलेल्या पूनम यांच्या चेह-यावर वाढत्या वयाचा मुळीच प्रभाव दिसत नाही. आजही त्या पूर्वी एवढ्याच सुंदर दिसतात.
पूनम यांचा जन्म जाट कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय सेनेत इंजिनिअर आणि आई गृहिणी होत्या. चंदीगड येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून पुढचे शिक्षण पूर्ण केले. पूनम यांना हिंदी सिनेसृष्टीत पहिला ब्रेक हा यश चोप्रा यांनी दिला होता. त्यांच्या 'त्रिशुल' या सिनेमाद्वारे पूनम यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर 1979 मध्ये आलेल्या यश चोप्रांच्याच 'नूरी' या सिनेमात त्यांना लीड रोल मिळाला. या सिनेमासाठी पूनम यांना पहिल्यांदा फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.
1977मध्ये ठरल्या मिस इंडिया
1977 मध्ये वयाच्या केवळ 16 वर्षी पूनम यांनी मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. एका मॅगझिनमध्ये पूनम यांचे छायाचित्र बघूनच यश चोप्रा यांनी त्यांना 'त्रिशुल' हा सिनेमा ऑफर केला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. यामध्ये सचिन पिळगावकर पूनम यांचे हीरो होते. या सिनेमातील ‘गुपुची गुपुची गम गम’ हे गाणे आजही पूर्वी इतकेच लोकप्रिय आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात पूनम यश चोप्रांच्या घरीच वास्तव्याला होत्या.
पहिल्याच सिनेमात घातला होता स्विमसूट
मॉडेलिंग क्षेत्रातून सिनेसृष्टीत आलेल्या पूनम यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. इंडस्ट्रीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांची ऑन स्क्रिन जोडी खूप गाजली. 10व्या वर्गात शिकत असतानाच पूनम 'त्रिशुल' सिनेमाद्वारे प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. पहिल्याच सिनेमात त्यांनी आपली बोल्डनेसची झलक दाखवली होती. या सिनेमात त्यांनी स्विमसूट परिधान केला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन स्टारर 'गिरफ्तार' या सिनेमात त्या स्विमसूटमध्ये झळकल्या होत्या.
फिल्मफेअरच्या कव्हरपेजवर झळकल्या पूनम
ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पूनम फिल्मफेअर या प्रतिष्ठित मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकल्या आहेत. त्यांनी लक्स साबणाच्या जाहिरातीतदेखील काम केले. आपल्या करिअरमध्ये 90 हून अधिक सिनेमांत झळकलेल्या पूनम यांचे 'काला पत्थर', 'बीवी ओ बीवी', 'ये तो कमाल हो गया', 'तेरी मेहरबानियां', 'कसम', 'सोनी महिवाल', 'दर्द', 'निशान', 'जमाना', 'रेडरोज' हे गाजलेले निवडक सिनेमे आहेत. हिंदीसोबतच त्यांनी बंगाली, तामिळ आणि कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
निर्माते अशोक ठकारियासोबत लग्न
दहा वर्षांच्या यशस्वी करिअरनंतर पूनम यांनी 1988मध्ये निर्माते अशोक ठकारियासोबत लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दुर्दैवाने फार काळ त्यांचे लग्न टिकले नाही. 1997मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पूनम आता पतीचे घर सोडून मुलांसोबत वेगळ्या राहतात.
छोट्या पडद्यावरही ठरल्या यशस्वी
सिनेमांपासून दूर झाल्यानंतर त्या छोट्या पडद्याकडे वळल्या. सिनेमांपासून ब्रेक घेऊन काही काळ त्यांनी रंगभूमीवरही काम केले. 'बिग बॉस'च्या तिस-या पर्वात त्या सेकंड रनरअप ठरल्या होत्या. अलीकडच्या काळात प्रभूदेवाच्या 'रमैया वस्तावैय्या' या सिनेमात त्या झळकल्या. त्यांची 'एक नई पहचान' ही मालिकासुद्धा गाजली. अभिनेत्रीसोबतच पूनम यशस्वी बिझनेस वुमनदेखील आहेत. व्हॅनिटी नावाच्या मेकअप कंपनीच्या त्या संचालिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, पूनम यांची तारुण्यात पदार्पण केल्यापासून ते पन्नाशी ओलांडल्यानंतरची छायाचित्रे...