आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे बॉलिवूडची राधे माँ, वयाच्या 39 व्या वर्षी बंद झाल्या सिनेमाच्या ऑफर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूनम झावर (डावीकडे), राधे माँ (उजवीकडे) - Divya Marathi
पूनम झावर (डावीकडे), राधे माँ (उजवीकडे)
मुंबईः नेहमी वादात राहणारी राधे माँ आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. या वादग्रस्त राधे माँमुळे बॉलिवूडची आयटम गर्ल पूनम झावर चर्चेत आली आहे. पूनमने काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर 'ओह माय गॉड' या सिनेमात राधे माँशी साधर्म्य साधणारी भूमिका साकारली होती. ट्विटरवर राधे माँची मिनी स्कर्टमधील छायाचित्रे प्रकाशित झाल्यानंतर पूनमने ट्विटरवर स्वतःची छायाचित्रे अपलोड करुन 'मी आहे खरी राधे माँ' असे ट्विट केले आहे.

पूनमने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात अक्षय कुमारच्या 'मोहरा' या सिनेमातून केली होती. मात्र तिला ओळख मिळाली नव्हती. त्यानंतर तिने सिनेमांमध्ये आयटम नंबर करणे सुरु केले होते. लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी पूनम अधूनमधून हॉट फोटोशूट्स करत असते.
कोण आहे पूनम झवर?
पूनमचा जन्म 14 ऑगस्ट 1976 रोजी मुंबईत झाला. पूनमचे कुटुंब मुळचे राजस्थानमधील आहे. मात्र तिचे बालपण मुंबईत गेले. पूनमने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरातींमधून केली होती. त्यानंतर तिला 'मोहरा' या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. मात्र या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळू न शकल्याने ती आयटम नंबरकडे वळली. त्यानंतर तिला प्लेबॉय या मासिकासाठी फोटोशूट करण्याची ऑफर मिळाली होती. ती तिने स्वीकारली नाही. कारण या मासिकासाठी तिला न्यूड फोटोशूट करण्याची अट घालण्यात आली होती.
बॉलिवूडमध्ये आहेत राधे माँचे भक्त
बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य, टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी, भोजपुरी अभिनेता रवि किशन, भोजपुरी गायक मनोज तिवारी हे राधे माँचे भक्त आहेत. याशिवाय अभिनेत्री डॉली बिंद्रा अनेकदा राधे माँच्या दरबारात दिसली आहे. शिवाय गायिका अनुराधा पौडवाल आणि अनुप जलोटासुद्धा राधे माँच्या दरबारात गाताना दिसले आहेत.
कोण आहे राधे माँ..
राधे माँचे खरे नाव सुखविंदर आहे. तिचा जन्म 4 एप्रिल 1965 रोजी भारत-पाक सीमेवर असलेल्या दोरंगला या छोट्याशा गावात झाला. वयाच्या 18 व्या वर्षी तिचे लग्न मनमोहन सिंह नावाच्या तरुणासोबत झाले होते. लग्नानंतर राधे माँचा नवरा नोकरीच्या निमित्ताने कतरची राजधानी दोहा येथे निघून गेला. हलाखीची परिस्थिती असल्याने राधे माँ शिवणकाम करुन घराचा खर्च चालवायची. वयाच्या 21 वर्षी ती महंत रामाधीन परमहंस यांना शरण गेली. परमहंस यांनी सुखविंदरला सहा महिन्यांपर्यंत दीक्षा दिली. त्यानंतर तिचे नाव राधे माँ पडले आणि ती मुंबईत आली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बॉलिवूडमधील कोणकोणते नावाजलेले सेलिब्रिटी राधे माँचे भक्त आहेत...