आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : या हॉस्पिटलमध्ये झाला होता प्रियांकाचा जन्म, बालपण गेले आजीच्या घरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपुर(झारखंड) - बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही चर्चेत असणारी अॅक्ट्रेस प्रियांका चोप्रा आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रियांकाचा जन्म 18 जुलै 1982 ला जमशेदपूरमधील टाटा मेन हॉस्पिटलमध्ये झाला होता. याठिकाणी तिचे घर आणि आजोळही आहे. 

आजी होती काँग्रेस आमदार.. 
- जमशेदपूरमध्ये जन्मलेल्या अॅक्ट्रेस प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा भारतीय लष्करात डॉक्टर होते. त्यांचे वडील अंबालाचे राहणारे होते. 
- नोकरीतील बदलीमुळे प्रियांकाचे कुटुंब लडाख, लखनऊ, बरेली आणि पुणे सारख्या शहरांत गेले होते. 
- यामुळे प्रियांकाचे बहुतांश बालपण लेह, बरेली अशा शहरांत गेले. 
- प्रियांकाचता भाऊ सिद्धार्थ चोप्रा तिच्यापेक्षा सात वर्षांनी छोटा आहे. अॅक्ट्रेस परिणिती चोप्रा आणि मीरा चोप्रा या तिच्या बहिणी आहेत. 
- प्रियांकाचे प्राथमिक शिक्षण 'ला मार्टिनियेर गर्ल्स स्कूल' मध्ये झाले होते. 
- प्रियांकाची आजी मधू ज्योत्सना अखौरी यांचे पती डॉ एमके अखौरी जमशेदपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष होते. 
- मधु अखौरी यांनी 1962 मध्ये जमशेदपूरमधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर 1967 मध्ये पुन्हा जमशेदपूर पूर्वमधून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. 

शुटिंग पाहायला जायची आजी.. 
- प्रियांका चोप्राची आजी मधू ज्योत्सना अखौरीला चित्रपटांत रस होता. त्या मुंबईत असताना प्रियांकाच्या चित्रपटांचे शुटिंग पाहायला जात होत्या. 
- मधु अखौरी यांचे 2016 मध्ये मुंबईत निधन झाले. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रियांकाचे बालपणीपासूनचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...