आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actress Priyanka Pandit With Most Wanted Nitin Chopda

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोस्ट वाँटेडसोबत सापडली भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अॅक्ट्रेस, जाणून घ्या कोण आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः भोजपुरी अभिनेत्री प्रियांका पंडीत - Divya Marathi
फाइल फोटोः भोजपुरी अभिनेत्री प्रियांका पंडीत

रायपूरः छत्तीसगडची राजधानी राजपूरमधील एमसीएक्स ट्रेडर आणि गेल्या चार वर्षांपासून मोस्ट वाँटेड असलेल्या नितीन चोपडाला मुंबईच्या पॉश जुहू परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पकडले तेव्हा भोजपुरी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रियांका पंडीत त्याच्यासोबत होती. याशिवाय 'जमाई राजा' टीव्ही सिरिअलची अॅक्ट्रेस रेहाना मल्होत्रासुद्धा त्याच्यासोबत होती.
कोण आहे प्रियांका पंडीत?
प्रियांका पंडीत भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. भोजपुरी इंडस्ट्रीतील महागडी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. अल्पावधीतच तिने या इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या डान्स, रोमँटिक आणि बोल्ड सीन्सचे अनेक चाहते आहेत. 'जीना तेरी गेली में' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या प्रियांकाने पहिल्याच सिनेमाद्वारे ती इंडस्ट्रीत लांबचा पल्ला गाठेल, असे सिद्ध केले.
पवन सिंहसह अनेक भोजपुरी अभिनेत्यांसोबत झळकली, मनोज तिवारींनी केले आहे कौतुक
भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील गायक आणि खासदार मनोज तिवारी यांनी प्रियांकाच्या कामाचे खूप कौतुक केले आहे. इतकेच नाही तर ती प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आणि गायक पवन सिंहसोबतही झळकली आहे. पवन सिंह यांनी स्वरबद्ध केलेले 'लॉलीपॉप लागेलू...' हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. पवन सिंह यांच्यासह निरहरुआ आणि खेसारी लाल या अभिनेत्यांसोबत प्रियांकाने स्क्रिन शेअर केली आहे.

का झाली नितीनला अटक?
नितिन रायपूरमधील प्रसिद्ध MCX (Multi Commodity Exchange)चे ट्रेडर आणि गेल्या चार वर्षांपासून मोस्ट वाँटेड आहे. त्याच्या विरोधात अपहरण, लूटसह अनेक गुन्हे दाखल आहेत. एका पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, नितीन चोपडाचे मुंबईतील अनेक मॉडेल्ससोबत मैत्रीचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. जुहूतील एका पॉश परिसरात ज्या फ्लॅटमध्ये तो वास्तव्याला होता, त्याचे दरमहा भाडे 80 हजार आहे. याशिवाय मुंबईत त्याच्याकडे बीएमडब्ल्यू आणि ऑडी या महागड्या कारसुद्धा आहेत. दर तीन-चार महिन्याला आपली लिव्ह इन पार्टनर बदलणे ही त्याची सवय झाली होती. नितीनने मॉडेलिंग क्षेत्रातील आपल्या मैत्रिणींवर दर महिन्याला 25 ते 30 लाखांचा खर्च केल्याचेही समोर आले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाह, प्रियांका पंडीतची निवडक छायाचित्रे...