Home »Gossip» Actress Rekha Beauty Secrets And Unknown Facts On Her Birthday

हे आहे रेखाच्या सौंदर्याचे रहस्य, वयाच्या 63 व्या वर्षीही आघाडीच्या अॅक्ट्रेसेसना देते मात

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 13:31 PM IST

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक देखण्या अभिनेत्री होऊन गेल्या. पण रेखासारखे सौंदर्य क्वचितच बघायला मिळाले. आज (10 ऑक्टोबर) आपला 63 वा वाढदिवस साजरा करणारी रेखा वाढत्या वयात आणखीनच सुंदर दिसू लागली आहे. खरं तर वयाच्या तिशी पस्तीशीनंतरच चेह-यावर वाढत्या वयाचा परिणाम दिसू लागतो. पण रेखा मात्र याला अपवाद ठरली आहे. वयाच्या साठीनंतरदेखील ती विशीतील तरुणींना लाजवेल एवढी सुंदर दिसते. आजही तिच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. वयाच्या या टप्प्यावर येऊनदेखील रेखा एवढी सुंदर कशी दिसते? तिच्या सौंदर्याचे रहस्य आहे तरी काय? हे आज आम्ही वाचकांना सांगत आहोत. रेखाचे हे ब्युटी सीक्रेट्स तुम्हीदेखील फॉलो करु शकता.
आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींना सौंदर्यात देते मात..
रेखा दररोज भरपूर पाणी पिते. दिवसभरात ती कमीत कमी दहा ते बारा ग्लास पाणी पिते. पाण्यामुळे आपल्या शरीरातील सर्व टॉक्सिंस आणि विषारी द्रव बाहेर पडतात. त्यामुळे शरीर आतून सुंदर बनतं आणि तुम्ही तरुण दिसू लागता. रेखा ही पद्धत अमंलात आणते.
याशिवाय रेखा तळलेल्या वस्तू आणि अधिक प्रमाणात शिजलेले अन्न खात नाही.

पुढे वाचा, रेखाच्या सौंदर्याचे रहस्य आहे तरी काय...

Next Article

Recommended