आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' एका घटनेने पुरती कोलमडली होती 'चंद्रनंदिनी', तेव्हा मिळाली बॉयफ्रेंडची साथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः स्टार प्लस वाहिनीच्या 'चंद्रनंदिनी' या मालिकेतील नंदिनीच्या भूमिकेतून घराघरांत प्रसिद्ध झालेली अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद अभिनय क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. वयाच्या 11 व्या वर्षीपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेली श्वेता एक मीडिया स्टुडंट आहे. श्वेताला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली होती ती 'मकडी' या सिनेमाने. या सिनेमासाठी श्वेताने राष्ट्रीय पुरस्कार स्वतःचे नाव कोरले होते. 

आयुष्यात आला होता अतिशय वाईट काळ... 
- 2014 साली श्वेताच्या आयुष्यात अतिशय वाईट काळ आला होता. हैदराबादच्या एका हॉटेलमध्ये श्वेताला सेक्स रॅकेट प्रकरणात अटक झाली होती.  
- हैदराबाद शहरातील ‘बंजारा हिल्स’या उच्चभ्रू परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये पोलिसांनी धाड टाकली तेव्हा श्वेता बसू रंगेहात पकडली गेली होती. ‘सेक्स रॅकेट’शी संबंध असल्याचा आरोप श्वेतावर होता. 
- अटकेनंतर 56 दिवस श्वेता रेस्क्यू होममध्ये होती. त्यानंतर तिला सेशन कोर्टाने क्लिन चिट दिली होती. त्यानंतर तिने सर्व आरोप फेटाळले होते. 

बॉयफ्रेंडची मिळाली साथ...
- सेक्स रॅकेटमध्ये नाव अडकल्यानंतर श्वेता खासगी आयुष्यात पुरती कोलमडून गेली होती. पण याचकाळात रोहित मित्तल या तरुणाची तिच्या आयुष्यात एन्ट्री झाली आणि तिचे आयुष्य बदलले. रोहितने तिला या दुःखातून बाहेर पडण्यास खंबीरपणे साथ दिली. 
- 2014 पासून श्वेता रोहितसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. एका मुलाखतीत स्वतः श्वेताने तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. शिवाय रोहितसोबतचे फोटोज श्वेता तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. 
- दोन वर्षांपासून फिल्ममेकर रोहित मित्तलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे श्वेताने मान्य केले. श्वेता म्हणाली, "आम्ही दोघे आमच्या रिलेशनशिपला एन्जॉय करतोय. मात्र अद्याप आम्ही लग्नाचा निर्णय घेतलेला नाही. मात्र आमचे नाते चांगले आहे. रोहितसोबत माझी पहिली भेट फँटम फिल्म्समध्ये झाली होती."  
- सेक्स रॅकेट प्रकरणातून बाहेर पडल्यानंतर श्वेताला लगेचच अनुराग कश्यपकडून काम करण्याची संधी मिळाली होती. स्क्रिप्ट रायटर म्हणून ती त्याच्या 'फॅन्टम फिल्म्स' या प्रॉडक्शन कंपनीमध्ये रुजू झाली. इथेच तिला तिचा आयुष्याचा जोडीदार मिळाला. अनुरागच्या ऑफिसमध्येच या दोघांची पहिली भेट झाली होती.

पुढे वाचा, सेक्स स्कँडलमध्ये अडकल्यानंतर काय दिले होते श्वेताने स्पष्टीकरण... 
बातम्या आणखी आहेत...