आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमँटिक सीनसाठी लाजली होती ही अभिनेत्री, जाणून घ्या कशी केली सिनेमांत एंट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा - Divya Marathi
पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा
चंदीगढ: पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा एका सिनेमात रस्त्यावर रोमँटिक सीन देताना लाजली होती. एका कार्यक्रमानिमित्त बुधवारी (22 जून) चंदीगढमध्ये पोहोचलेल्या सोनमने सांगितले, की तिला कशी फिल्म इंडस्ट्रीत एंट्री मिळाली. साऊथ सिनेमांत नाव कमावलेल्या या अभिनेत्री सांगितले, की तिला स्वत:मध्ये रमायला आवडते आणि ती एक साधी-सरळ मुलगी आहे. ती तिच्या कामासाठी पॅशनेट आहे.
सोनमने गप्पा मारताना आणखी काय सांगितले...
- सोनम म्हणाली, ती लवकर कुणात मिसळत नाही. तिचे मोजकेच फ्रेंड्स आहेत.
- त्यांच्यासोबतच ती सर्व गोष्टी शेअर करते. सोनमला डान्स करायला आवडते, परंतु ट्रेंड डान्सर नाहीये. सध्या डान्सिंगमधील बारकावे शिकत आहे.
- तिने सांगितले, की एक दोन गाणे केल्याने कुणी आयटम गर्ल बनत नाही. बदतल्या काळासोबत, आता आयटम नंबरसुध्दा बदलले आहेत.
- आता आयटम नंबर्स आयटम नंबर्स राहिले नाही तर डान्स नंबर्स झाले आहेत. याच्याशी दीपिका पदुकोण, जॅकलीन फर्नांडिस आणि नर्गिस फाखरीसारख्या अभिनेत्री जुळल्या आहेत.
...म्हणून लाजली होती ही अभिनेत्री
- सोनम सांगते, की गर्दीच्या ठिकाणी रोमँटिक सीन. ऐकायला स्वप्ना पडल्यासारखे वाटले. परंतु असाच रोमँटिक सीन मला 'पंजाब 1984' सिनेमासाठी करायचा होता.
- लोकेशन होते अमृतसरचे मेन मार्केट. दोन मिनीट मला आणि पंजाबी अभिनेता दिलजीतला रोमान्सच्या अंदाजात एकमेकांच्या डोळ्यात बघायचे होते.
- आजूबाजूला लोकांची ये-जा सुरु होती. समोरून आवाज येत होते. अशा परिसरात लक्ष केंद्रीत करणे कठिण होते.
- या सीनवेळी मी इतक्या वेळा लाजले, की मला 9 वेळा रिटेक घ्यावे लागले होते.
आयटम गर्लवर सोनमची प्रतिक्रिया...
- आयटम गर्लविषयी प्रश्न विचारल्यावर सोनमने सांगितले, 'मी नाही मानत, की डान्स नंबर करणे चुकीचे आहे. मीसुध्दा 'वीरवार' हा डान्स नंबर केला आहे. आजसुध्दा लोक त्यासाठी माझी प्रशंसा करतात.'
- काही लोक वर्षभरातून 10-12 डान्स नंबर करतात. त्याशिवाय दुसरे काहीच करत नाहीत. म्हणून त्यांच्या नावापुढे आयटम गर्ल जोडले जाते.
अशी झाली ग्लॅमर करिअरची सुरुवात...
- सोनमने सुरुवातीच्या दिवसांचा उल्लेख करून सांगितले, की खरे म्हणजे 2012मध्ये मी ब्यूटी पेजेंट मिस इंडिया केले तिथून माझी सुरुवात झाली.
- मला ऑफर यायला लागल्या आणि एंटरटेन्मेंट जगाशी जोडली गेली. स्वत:ला नशीबवान समजते, की मला जास्त संघर्ष करावा लागला नाही.
- आतापर्यंत केवळ तीन सिनेमे केले आहेत. त्यातूनच मला ओळख मिळाली.
- आता ईच्छा आहे, की अभिनयात असा ट्रेंड बनवायचा, ज्यामुळे लोक मला कायम लक्षात ठेवतील. एक यशस्वी तरुणी म्हणून ओळखतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोनमचे ग्लॅमरस फोटो...
बातम्या आणखी आहेत...