आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा सिल्व्हर स्क्रिनवर ग्लॅमरस दिसणा-या स्वस्तिकाच्या 14 वर्षाच्या मुलीला, पाहा आई-लेकीचे PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः मुलगी अन्वेशासोबत अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी)
मुंबईः येत्या 3 एप्रिल रोजी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' हा सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे. या सिनेमात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि आनंद तिवारीसोबत बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी मेन लीडमध्ये आहे.
स्वस्तिकाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
स्वस्तिका मुखर्जी या सिनेमात सुशांतसोबत रोमान्स करताना दिसणारेय. यामध्ये ती अंगुरी देवीची भूमिका साकारत आहे. 14 वर्षाच्या मुलीची आई असलेल्या स्वस्तिकाने सिनेमात ग्लॅमरस रोल साकारला आहे. यशराज बॅनरच्या या सिनेमाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जीने केले आहे.
'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' हा स्वस्तिकाचा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. मात्र बंगाली फिल्म इंडस्ट्रीतील ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बंगाली टीव्ही आणि सिनेमांमध्ये काम करुन तिला 12 वर्षे झाली आहेत.
कोण आहे स्वस्तिका मुखर्जी
अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीचा जन्म 13 डिसेंबर 1980 रोजी कोलकाता येथे झाला. स्वस्तिका पहिल्यांदा छोट्या पडद्यावर प्रसारित झालेल्या 'देवदासी' या मालिकेत झळकली होती. 2003मध्ये 'हेमांतर पाखी' या बंगाली सिनेमाद्वारे तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. हा सिनेमा उर्मी चक्रवर्ती यांनी दिग्दर्शित केला होता. तर मस्तान या सिनेमात ती पहिल्यांदा लीड रोलमध्ये झळकली. या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात को-स्टार जीतसोबत तिचे सूत जुळले. त्यानंतर ही जोडी ब-याच सिनेमांमध्ये एकत्र झळकली.
स्वस्तिकाची कौटुंबिक पार्श्वभूमी
अभिनेता संतू मुखर्जींची कन्या असलेल्या स्वस्तिका मुखर्जीने 1998 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी प्रमीत सेनसोबत लग्न केले. 2000मध्ये तिने मुलगी अन्वेशाला जन्म दिला. प्रमीत आणि स्वस्तिकाचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. दोन वर्षांपूर्वी ती आपल्या पतीपासून विभक्त झाली. मुलगी अन्वेशाची कस्टडी स्वस्तिकाकडेच आहे. 14 वर्षाच्या मुलीची आई असलेली स्वस्तिका केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातदेखील खूप ग्लॅमरस आणि बिनधास्त आहे.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला स्वस्तिका आणि तिची मुलगी अन्वेशाची खास छायाचित्रे दाखवत आहोत.