आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actresses Then And Now Pictures Will Leave You Speechless

Before & Now: एकेकाळच्या या फॅशन आयकॉन आता दिसतात म्हाता-या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ममता कुलकर्णीचे पुर्वी आणि आत्ताचे छायाचित्र)

मुंबईः 90 च्या दशकात आपल्या बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकणा-या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईत जन्मलेल्या ममताने नुकतीच वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. 'डोंगा पुलिस' या तेलगू सिनेमाद्वारे ममताने अभिनयाचा श्रीगणेशा केला. दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी ममताला 'तिरंगा' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी दिली.
1993 मध्ये रिलीज झालेला 'आशिक आवारा' हा सिनेमा ममताच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा ठरला. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा बोल्ट न्यू फेस अवॉर्डसुद्धा मिळाला. ममताने आपल्या करिअरमध्ये 'भूकंप', 'अशांत', 'विष्णु विजय', 'बाजी', 'सबसे बड़ा खिलाड़ी', 'करण-अर्जुन', 'नसीब', 'चाइना गेट', 'छुपा रुस्तम', 'क्रांतिवीर', 'आंदोलन', 'किस्मत' यांसह अनेक सिनेमात काम केले आहे.
90 च्या दशकात बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्रींमध्ये ममताची गणना व्हायची. तिने एका प्रतिष्ठित मॅगझिनसाठी टॉपलेस होण्याचे धाडसही दाखवले होते. वयाची चाळीशी ओलांडणा-या ममताचे ग्लॅमर आता कुठे तरी मागे पडले आहे.
काही दिवसांपूर्वी तिचे एक छायाचित्र समोर आले होते. या छायाचित्रात तिच्या चेह-यावर वाढत्या वयाचा प्रभाव स्पष्ट जाणवतोय. ती आता बरीच लठ्ठदेखील झाली आहे. केवळ ममताच नव्हे तर बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या बदलत्या काळानुसार आता म्हाता-या दिसू लागल्या आहेत.
एक नजर टाकुया अशाच काही अभिनेत्रींवर..