आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रेसी, तनुश्री, नेहासह या अॅक्ट्रेस ठरल्या Flop, काहींना बोल्डनेसही आले नाही कामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री ग्रेसी सिंह)
बॉलिवूड अभिनेत्री ग्रेसी सिंहने सोमवारी (20 जुलै) 35वा वाढदिवस साजरा केला. तिचा जन्म 20 जुलै 1980 रोजी दिल्लीमध्ये झाला. ग्रेसीने इंजिनिअर व्हावे अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती, मात्र तिने मॉडेलिंगकडे आपला मोर्चा वळवला. तिने 1997मध्ये छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या 'अमानत' मालिकेतून अभिनय करिअरची सुरुवात केली. यादरम्यान तिने आमिर खान स्टारर 'लगान' सिनेमासाठी स्क्रिन टेस्ट दिली आणि सिनेमासाठी तिची निवड झाली. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर तिने मोजक्या सिनेमांत काम केले. मात्र फ्लॉप सिनेमांमुळे तिचे फिल्म करिअर हिट होऊ शकले नाही. ती मागील अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे.
बॉलिवूडमध्ये ग्रेसीप्रमाणेच अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे फिल्म करिअर फ्लॉप ठरले. त्यांनी हिट सिनेमांपासून करिअरची सुरुवात केली, मात्र फ्लॉप सिनेमांमुळे त्यांचे करिअर संपुष्टात आले.
झी टीव्हीच्या 'अमानत' शोमध्ये झळकली ग्रेसी-
ग्रेसीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. मॉडेलिंग करताना तिला झी टीव्हीच्या 'अमानत' मलिकेत काम करण्याची संधी मिळाली. यादरम्यान ग्रेसीने 'लगान' सिनेमासाठी स्क्रिन टेस्ट दिली आणि तिची निवड झाली. तिने आमिर खानसोबत काम केले आणि 'लगान' सुपरहिट ठरला. त्यानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या.
ग्रेसीचे सिनेमे-
2003मध्ये तिने अजय देवगणसोबत 'गंगाजल' आणि 2004मध्ये संजय दत्तसोबत 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमांत काम केले. दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. ग्रेसीने 'अरमान', 'मुस्कान', 'शर्त', 'वजह', 'हम आपके दिल मे रहते है', 'चंचल', 'देशद्रोही', 'देख भाई देख', 'मिलता है चान्स बाय चांस', 'कयामत ही कयामत', 'असीमा'सारख्या सिनेमांत काम केले. दोन-तीन सिनेमे सोडल्यास तिच्या इतर सिनेमांमनी बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवली नाही. आज ती लाइमलाइटपासून दूर आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, अशा अभिनेत्रींविषयी ज्यांचे फिल्म करिअर ठरले फ्लॉप...