आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाआधीच प्रेग्नेंट होती महिमा चौधरी, श्रीदेवी, नीना-कोंकणा यांनाही लग्नाआधीच गेले होते दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 1997मध्ये प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या 'परदेस' सिनेमाने रात्रीतून एका अनोळखी चेह-याला स्टार बनवले. ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री महिमा चौधरी आहे. पहिल्याच सिनेमात बॉलिवूड स्टार शाहरुख खानसह काम करून लोकप्रियता मिळवली. या सिनेमाचे तिला जास्त काही फायदा झाला नाही. आज महिमा चौधरीचा वाढदिवस आहे. महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. 13 सप्टेंबर 1973 रोजी दार्जिलिंगमध्ये तिचा जन्म झाला. महिमाने आपले मॉडेलिंग करिअर ऋतू चौधरी नावाने सुरु केले होते. 'परदेस' सिनेमात सुभाष घईने तिला भूमिकाच नव्हे महिमा हे नावदेखील दिले. 'परदेस' सिनेमात काम करण्यापूर्वी महिमा एका जाहिरातीतसुध्दा झळकली आहे. याच जाहिरातीत महिमाला पाहून सुभाष घई यांनी तिला आपला सिनेमा साइन करून घेतला होता.
लग्नाआधीच गेले होते दिवस...

अलीकडेच एका मुलाखतीत महिमाने तिच्या भूतकाळाविषयी सांगितले. लग्नापूर्वी महिमा लिएंडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र लिएंडरसोबत तिचे नाते फार काळ टिकले नाही. लिएंडरपासून विभक्त झाल्यानंतर महिमाने २००६ मध्ये मुंबईतील आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले आणि लग्नाच्या काही महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. महिमा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती, असे म्हटले जाते. २०१३ मध्ये बॉबी आणि महिमा विभक्त झाले. महिमा सिंगल मदर असून मुलगी अरियानीचे संगोपन एकटीच करत आहे. मुलीचा एकट्याने सांभाळ करत असल्याने सिनेसृष्टीत लवकर कमबॅक करु शकली नसल्याचे, महिमाने सांगितले. त्याकाळात टीव्ही शोची परीक्षक आणि शो-रुमचे रिबन कापण्यासारखी कामे केली, जी माझ्यासाठी सोयीची होती, असे तिने मुलाखतीत सांगितले.

एकमेव महिमाच नव्हे तर बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अशा आणखी काही अभिनेत्री आहेत, ज्यांना लग्नाआधीच दिवस गेले होते. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, कोण आहेत या अभिनेत्री...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...