आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर या ग्लॅमरस अभिनेत्रींनी सिनेसृष्टीला ठोकला रामराम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक नीतू सिंह 57 वर्षांच्या झाल्या आहेत. परंतु आजसुध्दा त्यांचे सौंदर्य पूर्वीसारखेच कायम असून चेहरा नेहमी तजेलदार दिसतो. त्यांना जन्म 8 जुलै 1958 रोजी नवी दिल्ली येथे झाला. नीतू यांनी फिल्मी करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली होती आणि त्या एक अभिनेत्री म्हणूनसुध्दा नावारुपास आल्या.
1972मध्ये 'रिक्शावाला' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीच्या रुपात त्यांनी एंट्री केली होती. परंतु त्यांना 1973मध्ये आलेल्या 'यादो की बारात' सिनेमातून लोकप्रियता आणि ओळख मिळाली. 1975मध्ये पहिल्यांदा ऋषी कपूर यांच्यासोबत 'खेल खेल मे' सिनेमात त्यांनी काम केले.
60पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलेल्या नीतू सिंह यांनी ऋषी कपूर यांच्याशी 1980मध्ये लग्न केले. 1983मध्ये फिल्मी करिअरला रामराम ठोकला. वयाच्या केवळ 21व्या वर्षी लग्न करणा-या नीतू त्यावेळी करिअरमध्ये यशस्वी होत्या. 1983मध्ये प्रदर्शित झालेला 'गंगा मेरी मा' हा त्यांच्या यशस्वी करिअरमधील शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर 26 वर्षांनी अर्थातच 2009मध्ये त्यांनी 'लव्ह आज कल' सिनेमातून कमबॅक केले. शिवाय त्यांनी 'जब तक है जान', 'दो दुनी चार', 'बेशर्म'सारखे सिनेमे केले.
सांगितले जाते, की नीतू आणि ऋषी यांची लव्हस्टोरी कमी वयातच सुरु झाले होते. वयाच्या 14व्या वर्षीच नीतू ऋषी कपूरच्या प्रेमात पडल्या होत्या. बालकलाकार असल्याने दोघांनी नेहमी भेट व्हायची. नीतू सिंह आण ऋषी कपूर यांचे बॉलिवूडमधील चर्चेतील लग्नांपैकी एक आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकणा-या अभिनेत्रींविषयी...