मुंबईः बॉलिवूडची धक-धक गर्ल
माधुरी दीक्षित आणि तिचे डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाचा आज (17 ऑक्टोबर) 16 वा वाढदिवस आहे. 17 ऑक्टोबर 1999 रोजी माधुरी आणि श्रीराम नेने लग्नगाठीत अडकले होते. या दोघांचे लग्न भारतात, तर रिसेप्शन अमेरिकेत आयोजित करण्यात आले होते. माधुरी आणि श्रीराम नेने यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी, व्यावसायिक आणि राजकारणी त्यांच्या लग्नात सहभागी झाले होते. दिवंगत अभिनेते अमरिश पुरी, विलासराव देशमुख, यश चोप्रा आपल्या कुटुंबासह माधुरीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये सहभागी झाले होते. याशिवाय श्रीदेवी, नम्रता शिरोडकर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांनी या पार्टीत हजेरी लावली होती.
माधुरी दीक्षितच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने Divyamarathi.com तुम्हाला बी टाऊनमधील अशा काही अभिनेत्रींविषयी सांगत आहे, ज्यांचे पती इंडस्ट्रीत फारसे प्रसिद्ध नाहीयेत. या अभिनेत्रींनी अभिनेत्याची नव्हे तर दुस-याच क्षेत्रात कार्यरत असेलल्या पुरुषाची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली. या यादीत स्वतः माधुरीच्या नावाचाही समावेश आहे.
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने
डॉ. श्रीराम नेने माधुरीसोबत लग्न झाल्यानंतर प्रसिद्धीझोतात आले. 17 ऑक्टोबर 1999 रोजी माधुरी आणि श्रीराम नेने विवाहबद्ध झाले. डॉ. श्रीराम नेने हृदयविकार तज्ज्ञ आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशाच आणखी काही अभिनेत्रींविषयी...