आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पती-पत्नी सारखे राहायचो मी आणि कंगना', आदित्य पांचोलीने केलेत धक्कादायक खुलासे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगना रनोट आणि आदित्य पांचोली. - Divya Marathi
कंगना रनोट आणि आदित्य पांचोली.
मुंबई - कंगना रनोटने नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले की, तिच्या वडिलांच्या वयाच्या असलेल्या आदित्य पांचोलीने तिला घरात कैद करून ठेवले होते. स्वतःला वाचवण्यासाठी फर्स्ट फ्लोअरच्या खिडकीतून तिने खाली उडी मारली होती. एवढेच नाही, तर कंगनाने असेही म्हटले की, तिने आदित्यची पत्नी झरीनाकडे मदतही मागितली होती. पण तिने मदत करायला नकार दिला. जेव्हा काहीही पर्याय राहिला नाही तेव्हा ती पोलिसांकडे गेली. कंगनाच्या या वक्तव्यावर आदित्यने तिला पागल म्हटले आहे.  तसेच तिच्या विरोधात कायदेशीर कारवाईच्या पर्यायाचा विचार करणार असल्याचेही म्हटले आहे. यापूर्वीही आदित्य पांचोली यांनी तिच्याविषयी धक्कादायक खुलासे केलेले आहेत. 

आदित्यने म्हटले होते, पती-पत्नीसारखे राहायचो 
2008 मध्ये मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत आदित्य ने म्हटले होते. आम्ही पती पत्नीसारखे राहत होतो. मी आमच्या दोघांसाठी यारी रोडवर एक घरही ङेत होते. यादरम्यान तीन वर्षे आम्ही मित्राच्या घरी सोबत राहत होतो. 

अशी झाली होती पहिली भेट 
आदित्य यांनी पहिल्या भेटीबाबत सांगताना म्हटले होते की, तेव्हा ती मला भेटायला आली तेव्हा तिच्याकडे एक रुपयाही नव्हता. मी सर्वप्रथम तिला यारी रोडवर पाहिले होते. ती फार नैराश्यात होती. 27 जून 2004 ची ही घटना आहे. ती आशा चंद्र अॅक्टींग इन्स्टीट्यूटच्या मुलाबरोबर बाईकवर बसलेली होती. अचानक माझ्याजवळ येऊन ती मला 'Hi' म्हटली. तिने मला कंगना असल्याचे सांगताच, मला एका मित्राची आठवण आली. त्याने मला तिची (कंगना) मदद करायला सांगितले होते. त्यानंतर जोपर्यंत मी तिला भेटायला तयार झालो नाही, तोपर्यंत ती मला फोन करत राहिली. सुरुवातीला ती अगदी सिंपल आणि स्वीट टाऊन गर्ल होती. त्यामुळे मला ती आवडू लागली. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, कंगना आणि आदित्य यांची उर्वरीत स्टोरी... 
 
बातम्या आणखी आहेत...