आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकनंतर आदित्य पांचोलीचा कंगनाविरोधात खटला! हायर केले दोन वकील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनोटने तिच्या आयुष्याविषयी आणि वादांविषयी अगदी रोखठोखपणे मते मांडली. हृतिक रोशन आणि आदित्य पांचोलबरोबरच्या नात्याबाबतही ती थेट बोलली होती. पण आता या निर्भिडपणामुळे कंगना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आदित्य पांचोलीने कंगना रनोटवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला असून, त्यासाठी त्याने दोन वकीलही हायर केले आहेत. 

मुलाखतीत बोलताना कंगना म्हणाली होती, त्याने अपार्टमेंट माझ्यासाठी घेतले होते. पण त्याठिकाणी माझ्याच मित्रांना येण्याची परवानगी नव्हती. हा प्रकार म्हणजे हाऊस अरेस्ट सारखा होता. मला आठवते की, मी कशीतरी त्याच्या बायकोबर्यंत (झरीना वाहब) गेले आणि त्यांनी भेटून मी मला वाचवण्याची विनंती केली. पण त्यांनी मला मी मदत करू शकत नाही असे थेट सांगितले. 

कंगनाच्या मुलाखतीनंतर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही कंगनाचा विरोध केला होता. कंगना चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सर्वकाही करत असल्याचे म्हटले. आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरजलाही सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याला कंटाळून सूरज पांचोलीने त्याचे ट्विटर अकाऊंटच डिलीट केले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, कंगना आणि आदित्यच्या Love Story आणि वादाबाबत..
 
 
बातम्या आणखी आहेत...