आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ae Dil Hai Mushkil: Aishwarya Rai And Ranbir Kapoor Steamy Scenes Cut By Censor Board

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ऐ दिल है मुश्किल'वर सेन्सॉरची कात्री, वगळले रणबीर-ऐश्वर्याचे इंटीमेट सीन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने ऐ दिल है मुश्किल या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रीत झालेले तीन इंटीमेट सीन्स काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. हे सीन्स वगळल्यानंतर बुधवारी बोर्डाने करण जोहर दिग्दर्शित या सिनेमाला U/A सर्टिफिकेट दिले आहे. हा सिनेमा मोठ्यांसोबतच लहानांसुद्धा बघता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे.

करण जोहरशी निगडीत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डचे सदस्य ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा बघत असताना करण जोहर तिथे उपस्थित होता. बोर्डाने सिनेमाच्या थीमचे कौतुक केले. तर रणबीर-ऐश्वर्यावर चित्रीत झालेल्या काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला. हे सीन्स सिनेमाच्या कथेसाठी आवश्यक असल्याचे करणने सांगितले, मात्र सेन्सॉरने त्याचे म्हणणे ऐकले नाही. अखेर 28 ऑक्टोबर रोजी रिलीज होणा-या या सिनेमातील तीन सीन्स वगळण्यात आले. यापैकी एक सीन सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला होता.

...म्हणून ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये दाखवण्यात आले ऐश्वर्याचे बोल्ड सीन
'ऐ दिल है मुश्किल’च्या ट्रेलरमध्ये ऐश्वर्याचा बोल्ड लूक बघून सुरुवातीला सगळ्यांनाच धक्का बसला होता. तिचा हा बोल्ड अवतार बीग बी अमिताभ बच्चन यांनाही पसंत पडला नव्हता. पण हे सर्व सीन ऐश्वर्याच्या सांगण्यावरुनच तयार करण्यात आले होते. ऐश्वर्याच्या मते तिची व्यक्तिरेखा ही अधिक बोल्ड असणे आवश्यक होती. जेव्हा ऐश्वर्याकडे या सिनेमासाठी संपर्क केला तेव्हा सिनेमाची संहिता पूर्ण झाली नव्हती. ऐश्वर्याने तिच्या व्यक्तिरेखेबद्दल वाचले तेव्हा तिने यात काही बदल सुचवले आणि त्यानंतर यात काही बोल्ड सीनचा समावेश करण्यात आला. स्वतःची व्यक्तिरेखा अधिक बोल्ड करण्यावर तिने लक्ष दिले. तिच्या मते जर ही व्यक्तिरेखा अधिक बोल्ड झाली तर ती वास्तववादी वाटेल आणि लोकांनाही आवडेल.

मात्र आता सेन्सॉरच्या निर्णयानंतर ऐश्वर्यासोबतच तिच्या चाहत्यांची नक्की निराशा होणारेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, ऐश्वर्या आणि रणबीरवर चित्रीत झालेले काही सीन्स...
बातम्या आणखी आहेत...