आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानच्या आयुष्यातून युलियाची एक्झिट? आता हिच्यासोबत वाढतेय सलमानची जवळीक!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खान आणि यूलिया वंतूर यांचे ब्रेकअप झाल्याचे अद्याप जाहिर झालेले नाही. त्यातच आता सल्लूच्या नवीन लिंकअपची चर्चा रंगू लागली आहे. अलीकडेच मुंबईत सुपरस्टार रजनीकांत यांचा रोबोट या सिनेमाचा सिक्वेल ‘2.0' च्या फस्ट लूक लाँचला सलमानने सरप्राइज विजिट दिली होती. रजनीकांत यांच्यावरील प्रेमाखातर निमंत्रण नसताना या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे स्पष्टीकरण सलमानने यावेळी दिले होते.

मंचावर सलमानने रजनीकांत यांचे तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला होता, ‘मला या इव्हेंटचे आमंत्रण नव्हते. मात्र फक्त रजनी सरांना भेटण्यासाठी मी येथे पोहोचलो.’

मात्र आता बी टाऊनच्या जाणकारांच्या मते, सलमान येथे रजनीकांत यांच्यासाठी नव्हे तर अभिनेत्री एमी जॅक्सनसाठी सलमान येथे आला होता. सोहेल खान दिग्दर्शित `फ्रीकी अली' या सिनेमात एमी हीरोईन होती.

होम प्रॉडक्शनचा सिनेमा असल्या कारणामुळे त्याच्या नॅरेशनपासून ते शूटिंगपर्यंत ब-याच ठिकाणी सलमान आणि एमीच्या अनेकदा भेटीगाठी झाल्या होत्या. दरम्यान दोघांची मैत्रीसुद्धा वाढली. सुत्रांच्या माहितीनुसार, रोमानियाई गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसोबत सलमानचा दुरावा वाढतोय. त्यामुळे आता एमी जॅक्सन सलमानच्या आयुष्यात आनंद घेऊन आलीये.

विशेष गोष्ट म्हणजे, या इव्हेंटनंतर आयोजित पार्टीतदेखील सलमानने एमीसोबतच सर्वाधिक वेळ घालवला. अरबाजने ‘दबंग 3’साठी एमीला साइन केल्याचीही चर्चा आहे.
बातम्या आणखी आहेत...