आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unknown Facts: सनी देओलपेक्षा वयाने केवळ 8 वर्षे मोठी आहे त्याची सावत्र आई हेमा मालिनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः सनी देओल आणि हेमा मालिनी - Divya Marathi
फाइल फोटोः सनी देओल आणि हेमा मालिनी
बॉलिवूड स्टार सनी देओल आज आपला 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. 19 ऑक्टोबर 1956 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे त्याचा जन्म झाला. आपल्या खासगी आयुष्य मीडियापासून नेहमी लांब ठेवणा-या बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी सनी एक आहे. मात्र हेमा मालिनी यांच्यासोबतच्या नात्यामुळे तो नेहमी चर्चेत असतो. खरं तर सनी-हेमा यांचे मुलगा आणि आईचे नाते आहे. मात्र त्यांच्या वयातील अंतर खूप कमी आहे. सनीचा जन्म 1956 मध्ये झाला, तर हेमा यांनी 16 ऑक्टोबरला वयाची 67 वर्षे पूर्ण केली आहेत. दोघांच्या वयात केवळ आठ वर्षांचे अंतर आहे.
'बेताब'द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण
सनीने 'बेताब' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 80-90 च्या दशकात सनीने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले. 'अर्जुन', 'घायल', 'त्रिदेव', 'विश्वात्मा', 'दामिनी', 'डर', 'जीत', 'घातक', 'बॉर्डर', 'चालबाज', 'गदर: एक प्रेम कथा' हे त्याचे गाजलेले निवडक सिनेमे आहेत.
धर्मेंद्र यांनी जेव्हा हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले होते, त्याकाळात सनी बॉलिवूडमध्ये पदार्पणाची तयारी करत होते. सनी आणि बॉबी हे दोन्ही भाऊ आपल्या वडिलांच्या दुस-या लग्नामुळे नाराज होते. त्यामुळेच या दोन्ही भावांनी आजवर हेमा यांना आई म्हणून स्वीकारले नाही.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, बॉलिवूडमधील आणखी काही अशाच नातेसंबंधांविषयी....
बातम्या आणखी आहेत...