काही दिवसांपूर्वीच 'कहानी' सिनेमाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांची 'अहल्या' ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली. ही फिल्म रामायणातील अहिल्याच्या कथेवर आधारित असल्याचे आत्तापर्यंत म्हटले गेले. अहिल्या ही जगातील सर्वात सुंदर स्त्री असल्याची पुराणकथा आहे. मात्र व्यभिचाराच्या संशयातून तिचे पती गौतम ऋषी यांनी तिला शाप दिल्याचे म्हटले जाते. याच कथेला सुजॉय घोष यांनी मॉडर्न टच दिला आहे.
मात्र आता राधिकाची ही शॉर्ट फिल्म स्पॅनिश एनिमेशन फिल्म 'आल्मा'ची नकल असल्याचे म्हटले जात आहे. दिग्दर्शक रॉड्रिगो ब्लास यांची 'आल्मा' ही 5 मिनिटे 29 सेकंदाची शॉर्ट फिल्म 2009 मध्ये रिलीज झाली होती. 'आल्मा'चा अर्थ आत्मा असा होतो. सिनेमात आल्मा नावाची एक तरुणी एका खेळण्याच्या दुकानाजवळून जाते. तेथे तिला तिच्याच चेह-याची खेळणी दिसतात. तर 'अहल्या' या शॉर्टफिल्ममध्ये इन्स्पेक्टरसोबत असे घडते.
'अहल्या'मध्ये ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांनी शिल्पकाराची भूमिका साकारली आहे, तर राधिका आपटे त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. एका हरवलेल्या व्यक्तीच्या शोधात पोलिस इंद्र (तोता रॉय चौधरी) या दाम्पत्याच्या घरी येतो आणि एका रहस्यनाट्याला सुरुवात होते. शॉर्टफिल्ममध्ये टप्प्याटप्प्यावर कथेला कलाटणी मिळत जाते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'अहल्या'मधील राधिका आपटेची छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाईडमध्ये या शॉर्टफिल्मचा व्हिडिओ...