आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Spotted: बुके घेऊन गर्लफ्रेंड दीपिकाला एअरपोर्टवर घ्यायला पोहोचला रणवीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आपल्या मनमौजी स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. सोमवारी रणवीरचा असाच अंदाज बघायला मिळाला. त्यामुळे त्याच्या आणि दीपिकाच्या अफेअरच्या बातम्यांना अधिकच रंग चढले आहेत. झाले असे, की सोमवारी रात्री तो आधी सिनेमा बघायला गेला. शो संपताच तो एअरपोर्टला रवाना झाला. येथे दीपिका लंडनहून मुंबईला परतली होती. रणवीर फुलांचा गुच्छ घेऊन तिला रिसिव्ह करायला गेला होता. आपल्या बॉयफ्रेंडचे एवढे प्रेम आणि स्पेशल ट्रिटमेंट बघून दीपिका खूप आनंदी झाली. दीपिकाच्या चेह-यावरील स्मितहास्यामुळे रणवीरसुद्धा आनंदी दिसला. एअरपोर्टवरुन बाहेर पडल्यानंतर दोघेही एकाच कारमधून तेथून निघाले.
लवकरच ही रिअल लाइफ जोडी संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्यांच्यासोबत प्रियांका चोप्राही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एअरपोर्टवर क्लिक झालेली या लव्हबर्ड्सची खास झलक..