आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराध्याचे मीडियाला CUTE पोज देतानाचे फोटोज बघून अवाक् झाली ऐश्वर्या!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन सलग 16 व्या वर्षी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी ऐश्वर्याने रेड कारर्पेटवर एन्ट्री केली. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या तिची लाडकी लेक आराध्याला सोबत घेऊन गेली आहे. आपल्या मम्मीबरोबर जाताना आराध्याने फोटोग्राफर्सना काही क्यूट पोज दिल्या. आराध्या काय करतेय याकडे ऐश्वर्याचे त्या वेळी लक्ष नव्हते. आराध्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिने ते पाहिले आणि खुश झाली. फेस टाइममध्ये पत्रकारांशी गप्पा मारताना तिने आराध्यबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. 
 
आराध्या आता साडेपाच वर्षांची झाली आहे. आई ऐश्वर्याबरोबर ती कायम दिसते. नुकतीच कान महोत्सवाला जाण्यासाठी एअरपोर्टवर मम्मीबरोबर आलेल्या आराध्याचे एक वेगळेच टॅलेंट जगासमोर आले. एरव्ही ऐश्वर्याचे फोटो घेण्यासाठी आतुर असलेल्या फोटोग्राफर्सना आराध्यानेच काही पोज दिल्या. मग काय फोटोग्राफर्सनीही तिच्या या पोजचे मनापासून स्वागत केले. गेल्या तीन-चार दिवसांपासून आराध्याचे हे क्यूट फोटो व्हायरल होत आहेत आणि त्यावरच चर्चा होत आहे.

पुढे वाचा, आराध्याचे फोटोग्राफर्सना पोज देतानाचे फोटो सोशल मीडियावर बघून अवाक् झाली ऐश्वर्या... आणि वाचा स्वत:च्या आईपणाबद्दल काय म्हणाली ऐश्वर्या... 
 
बातम्या आणखी आहेत...