आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amazing bond: पुरस्कार सोहळ्यात बच्चन बहू ऐश्वर्याने रेखाला म्हटले \'माँ\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेखा यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ऐश्वर्या - Divya Marathi
रेखा यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ऐश्वर्या

एन्टरटेन्मेंट डेस्कः अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे कथित प्रेमप्रकरण एकेकाळी खूप गाजले होते. तेव्हापासून या दोन्ही कुटुंबीयांमध्ये नेहमीच दुरावा राहिला. मात्र आता हळूहळू हा दुरावा दूर होताना दिसतोय. अलीकडेच एका इव्हेंटमध्ये जया बच्चन यांनी रेखाची गळाभेट घेऊन भरपूर गप्पा मारल्या. मात्र, बच्चन कुटुंबियांची सून ऐर्श्वया राय ही त्याच्याही एक पाऊल पुढे गेली आहे. नुकत्याच झालेल्या स्टार डस्ट पुरस्कार सोहळ्यादरम्यान ऐश्वर्या रायने रेखा यांना ‘माँ’ असे संबोधले आणि पुन्हा एकदा नव्या चर्चेला सुरूवात झाली.
झाले असे, की एका पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्याला 'जज्बा' या सिनेमातील पॉवर पॅक्ड परफॉर्मन्ससाठी परफॉर्मर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री रेखाच्या हस्ते तिला हा पुरस्कार देण्यात आला. रेखा यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या स्पीचमध्ये ऐश्वर्याने रेखाला 'माँ' म्हणून संबोधित केले.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर गेल्यानंतर ऐश्वर्या राय खाली वाकून रेखा यांच्या पाया पडली. त्यानंतर रेखा यांनी ऐश्वर्याला आशिर्वाद देत पुरस्कार तिच्या हातात दिला. ऐश्वर्याला हा पुरस्कार देणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असून आणखी अनेक वर्षे मी तिला असे पुरस्कार देत राहील, असे रेखा यांनी म्हटले. दरम्यान, पुरस्कार मिळाल्यानंतर आभारप्रदर्शनाच्या भाषणात ऐश्वर्या रायने सर्वांचे आभार मानताना रेखा यांच्या दिशेने वळून दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि म्हटले की, ‘माँ’कडून हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्यासाठी ही गोष्ट खूप विशेष असल्याचे यावेळी ऐश्वर्याने सांगितले.
यावेळी अमिताभ बच्चनही प्रेक्षकांमध्ये बसले होते. मात्र, ऐश्वर्या हे सगळे बोलत असताना अमिताभ यांच्या चेहऱ्यावर अगदी शांत भाव होते. एकंदरीतच ऐश्वर्या रेखा आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये दुरावलेले नाते जवळ आणेल, असे म्हणता येईल.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या दुर्मिळ घटनेचा खास व्हिडिओ आणि इनसाइड फोटोज...