आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंदीपासून ते विदाईपर्यंत, पाहा ऐश्वर्या-अभिषेकचा Wedding Album

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 42 वर्षांची झाली आहे. 1 नोव्हेंबर 1973मध्ये मेंगलुरुमध्ये जन्मलेली ऐश्वर्याने महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत 20 एप्रिल 2007मध्ये लग्न केले. अभिषेक-ऐश्वर्या यांच्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत. आता ते तीन वर्षांच्या आराध्याचे आई-वडील आहेत.
करिश्मासोबत मोडला होता साखरपुडा, अभिषेकची झाली ऐश्वर्या-
'ढाई अक्षर प्रेम के' सिनेमात ऐश्वर्या आणि अभिषेकने पहिल्यांदा एकत्र काम केले. त्यानंतर दोघे 'उमराव जान' सिनेमातसुध्दा दिसले. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. 'गुरु' सिनेमाच्या सेटवर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. एकेकाळी करिश्मा कपूर अभिषेकची पत्नी होणार होती. ऑक्टोबर 2002मध्ये अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा झाला होता. परंतु जानेवारी 2003मध्ये हे नाते संपुष्टात आले. यानंतर चार वर्षांनी अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न झाले. जेव्हा घोड्यावर चढला तेव्हा चाहत्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली. अभिषेकने चेह-यावरील सेहरा काढून चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकार केल्या. या लग्नात बॉलिवूडसोबतच राजकिय नेते, क्रिकेटर्स, बिझनेसमन आणि इतर क्षेत्रातील लोकही पोहोचले होते.
कसे केले होते ऐश्वर्याला प्रपोज?
एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले होते, की टोरंटोमध्ये झालेल्या 'गुरु' सिनेमाच्या प्रिमीअरनंतर हॉटेलच्या बाल्कनीत उभे राहून अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. प्रपोज करताना तो खूप नर्व्हस होता. अभिषेकच्या सांगण्यानुसार, 'मी खूप घाबरत ऐश्वर्याला प्रपोज केले होते. तिने होकार देण्यासाठी एका सेकंदाचासुदा वेळ घेतला नाही.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाचे खास फोटो...