सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चनला एकत्र पाहिल्यानंतर कुणालाही आश्चर्य वाटेल. दोघे एकत्र येणेच काय एकमेकांना बघतदेखील नाहीत. परंतु एक आश्चर्याची बातमी समोर आली आहे. दोघे एकाच स्टुडिओमध्ये शूटिंग करताना दिसले.
एकेकाळी दोघांची जोडी रुपेरी पडद्यावर किती रोमँटिक आणि सुंदर दिसते, यापेक्षा जास्त ते खासगी आयुष्यात कसे राहतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले होते. मात्र दोघे विभक्त झाल्यानंतर चाहत्यांमध्ये ऐश्वर्याबद्दल उदासिनता वाढली. परंतु आजही ही जोडी एकमेकांच्या आसपासही दिसली, की चाहत्यांच्या नजरा त्याकडे वळतात. असाच एक क्षण 'महबूब स्टुडिओ'मध्ये दिसला. ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान दोघे एकाच वेळी या स्टुडिओमध्ये शूटिंग करताना दिसले. परंतु दोघेही वेगवेगळे होते.
सलमान खान बीइंग ह्यूमनच्या कॅम्पेनमध्ये व्यग्र होता आणि ऐश्वर्या एका मासिकाच्या फोटोशूटमध्ये बिझी होती. आता सलमान आणि ऐश्वर्या कधीही समोरा-समोर भेटले तर एकमेकांना दुर्लक्षित करताना दिसतात.