आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cannes Festival : गेल्या 13 वर्षांत या ड्रेसेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरली ऐश्वर्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(2004च्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता.)
मुंबईः माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन गेल्या 13 वर्षांपासून प्रतिष्ठेचा समजल्या जाणा-या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे. 2002 मध्ये ऐश्वर्या पहिल्यांदा कानच्या रेड कार्पेटवर अवतरली होती. कानमध्ये सहभागी होणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे. तेव्हापासून दरवर्षी ती या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे.
गेल्या 13 वर्षांत ऐश्वर्या अनेक स्टायलिश ड्रेसेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरली. कधी तिने परिधान केलेल्या ड्रेसचे विशेष कौतुक झाले, तर कधी तिच्यावर टीकासुद्धा झाली.
विशेषतः आई झाल्यानंतर ऐश्वर्या खूप लठ्ठ झाली होती. तेव्हा ती कोणता ड्रेस परिधान करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. अनेकदा इव्हिनिंग गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरलेली ऐश्वर्या मुलगी आराध्याच्या जन्मानंतर साडीत कानमध्ये अवतरली होती. यावेळी तिने परिधान केलेले बंद गळ्याचे ब्लाउज आणि गोल्डन-व्हाइट साडीची विशेष चर्चा झाली होती.
Divyamarathi.com तुम्हाला ऐश्वर्याची गेल्या 13 वर्षांतील कानच्या रेड कार्पेटवरील खास छायाचित्रे दाखवत आहे. या छायाचित्रांमध्ये तुम्ही तिने परिधान केलेले स्टायलिश आउटफिट्स बघू शकता...