आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cannesच्या रेड कार्पेटवर अवतरणे एवढे सोपे नाही... मदतीशिवाय बनत नाही परफेक्ट Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सः 70 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये माजी जगतसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा जलवा बघायला मिळला. शुक्रवारी आणि शनिवारी ऐश्वर्या कानच्या रेड कार्पेटवर अवतरली होती. तिचे रेड कार्पेटवरील दोन्ही लूक चाहत्यांना अक्षरशः घायाळ करणारे ठरले. यंदाच्या कानमध्ये ऐश्वर्या भाव खाऊन गेली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अगदी ड्रेसपासून ते मेकअप ज्वेलरी आणि हेअरस्टाइलपर्यंत सर्वकाही परफेक्ट होते. पण रेड कार्पेटवरील दहा ते पंधरा मिनिटांच्या अपिअरन्ससाठी ऐश्वर्याला बरीच मेहनत घ्यावी लागली. ऐश्वर्याचे दोन्ही ड्रेस घेरदार आणि हेवी असल्याने तिला ते सावरण्यासाठी चक्क काही लोकांची मदत घ्यावी लागली.

पाच जणांनी केली ड्रेस सावण्यासाठी मदत
19 मे रोजी ऐश्वर्याने डिझायनर मायकल सिन्कोने डिझाइन केलेल्या ब्लू कलरचा ब्रोकेड बॉल गाउन घालून  कॅटवॉक केला. ऐश्वर्याने या ड्रेसवर कोणतीही ज्वेलरी घातली नव्हती. तिच्या या लूकची प्रशंसा कुणी 'बेबी डॉल' म्हणून केली तर कुणाला ती 'डिस्ने प्रिंसेस' वाटली. ऐश्वर्याने परिधान केलेला हा गाऊन खूप घेरदार असल्याने तिला तो सावरण्यासाठी चक्क पाच जणांची मदत घ्यावी लागली. वरील छायाचित्रात तुम्ही ऐश्वर्याला तिचा ड्रेस सावरण्यासाठी तिच्या सहका-यांनी केलेली मदत बघू शकता. ड्रेस खूप घेरदार असल्याने तिला रेड कार्पेटवर चालताना तिला अडचणी आल्या. ऐश्वर्याची ही अडचण दूर करण्यासाठी चक्क पाच जणांनी रेड कार्पेटवर तिचा ड्रेस सावरण्यास मदत केली. या व्यक्ती ड्रेस सावरत असताना ऐश्वर्या फोटोग्राफर्सना पोज देताना कॅमे-यात क्लिक झाली. 

दुस-या दिवशीही अशीच घ्यावी लागली मदत...
शनिवारी ऐश्वर्या कानच्या रेड कार्पेटवर रेड कलरच्या ड्रेस अवतरली. हा ड्रेस तिच्यावर खूप शोभून दिसला. डार्क मरुन कलरच्या लिपस्टिकसोबत ऐश्वर्याने तिचा हा लूक कंप्लिट केला होता. तिने फक्त इअररिंग्स घातले होते. ऐश्वर्याचा हा ड्रेससुद्धा घेरदार असल्याने यावेळी तिला पाच जणांची नव्हे तर एका व्यक्तीची मदत घ्यावी लागली. रेड कार्पेटवर ऐश्वर्या फोटोग्राफर्ना पोज देत असताना एक व्यक्ती मागून तिचा ड्रेस पकडून तिच्यासोबत उभी होती. 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रेड कार्पेटवर अवतरताना ऐश्वर्याला कशी घ्यावी इतरांची मदत... 
बातम्या आणखी आहेत...