आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan\'s Jaw Dropping Pics Will Surely Make Your Day

बनारसी साडीत अवतरलेल्या माजी \'जगतसुंदरी\'वरुन हटणारच नाही तुमची नजर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेड-पिंक कलरच्या बनारसी साडीतील ऐश्वर्याचा दिलखेचक अंदाज. - Divya Marathi
रेड-पिंक कलरच्या बनारसी साडीतील ऐश्वर्याचा दिलखेचक अंदाज.

नवी दिल्ली- 67 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर मंगळवारी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांनी निवडक लोकांसोबत लंचचा आस्वाद घेतला. या मान्यवरांच्या यादीत बॉलिवूडची आघाडीचे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचाही समावेश होता. या कार्यक्रमात ऐश्वर्या फॅशन डिझायनर स्वाती-सुनैना यांनी डिझाइन केलेल्या रेड-पिंक कलरच्या बनारसी साडीत अवतरली. रेड-पिंक साडी, पिंक लिपस्टिक, केसांचा अंबाडा आणि गोल्डन ज्वेलरीत अवतरलेल्या ऐश्वर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचे हे रुप बघून उपस्थितांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या.
यावेळी ऐश्वर्याने फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि सिनेमांवर चर्चा केली. ऐश्वर्या राय-बच्चन मागील काही वर्षांपासून फ्रान्समध्ये होणार्‍या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होत आहे. ऐश्वर्याला 2012 मध्ये फ्रान्स सरकारने 'नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अॅण्ड लेटर्स' पुरस्काराने सन्मानित केले होते.
ऐश्वर्यासोबतच बॉलिवूडचा किंग खान शाहरुख, निर्माता आदित्य चोप्राने फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांची भेट घेतली. ओलांद यांच्यासोबत लंचचे अनेक सेलब्सला इन्व्हिटेशन मिळाले आहे. फ्रेंच वंशाची अॅक्ट्रेस कल्कि कोचलिनला देखील लंचला इनव्हाइट करण्यात आले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, या कार्यक्रमात क्लिक झालेली माजी जगतसुंदरीची ही खास छायाचित्रे...