आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढदिवशी आराध्याने परिधान केलेल्या फ्रॉकची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क! असा होता लूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी अलीकडेच त्यांच्या लाडक्या लेकीचा सहावा वाढदिवस साजरा केला. 16 नोव्हेंबर रोजी आराध्या सहा वर्षांची झाली. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐश्वर्या-अभिषेकने त्यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत आराध्याने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला पिंक गाऊन परिधान केला होता. या ड्रेसमध्ये आराध्या अगदी राजकुमारीसारखी दिसली. खरं तर आराध्याने परिधान केलेला ड्रेस दिसायला अगदी नॉर्मल असला, तरी त्याची किंमत थक्क करणारी आहे. आराध्याने फ्लोरल प्रिंट असेलला मिलेनियल पिंक बॉलरूम गाऊन परिधान केला होता. या गाऊनची किंमत तब्बल 60 हजार रुपये आहे. 


आराध्याचे 20 हजारांचे शूज...
- इतकेच नाही तर आराध्याने पिंक लेदर चियारा प्री-वॉकर्स शूज कॅरी केले होते. या शूजची किंमत तब्बल 20 हजार रुपये आहे. 

 

या सेलिब्रिटी किड्सनी एन्जॉय केली आराध्याची बर्थडे पार्टी...
- आराध्याच्या बर्थडे पार्टीत अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुलगा वियानसोबत पोहोचली. तर सोनाली बेंद्रेसुद्धा तिच्या मुलासोबत पार्टीत दाखल झाली. 
- संजय दत्तची मुले शाहरान आणि इकरासह फराह खानच्या तिळ्या मुलांनीही पार्टीत भरपूर एन्जॉय केले.
- तारा शर्मा, सोनाली कुलकर्णी, बंटी वालिया, सनी दीवान आणि डब्बू रत्नानीसुद्धा त्यांच्या मुलांसोबत पार्टीत पोहोचले होते.
- आराध्याच्या बर्थडे पार्टीचे इनसाइड फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये आराध्या आणि ऐश्वर्या डिझायनर ड्रेसमध्ये दिसत आहेत. पार्टीत ऐश्वर्याच्या आई वृंदा राय यांनीही उपस्थिती लावली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, आराध्याच्या बर्थडे पार्टीचे INSIDE PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...